हा एक कक्षेंत छावा गजाचा, दुजीमाजि हा सिंह केकावतो,
हा जाहला अर्धमेला भयानें लपोनी महाव्याघ्न डोकावतो;
हे पर्वतांचे उभे क्षुद्र धोंडे, महासागरांचे पुढें पल्लव !
बोला हवे तें, मला काय त्याचे ? पुरे जाणतों मीच माझें बल ।।
भूगोल हा दोन बोटांत माझ्या, नको अंतराला तुझी थोरवी
पाहीन एके दिनीं मीच सारे कुठें झांकलेले तुझे ते रवि !
हीं पंचभूतें मला सेविणारीं, खरें सांगतो मी न गर्वाकुल;

मी भासतों कीट, ही भूति माझी परी भेदि सूर्याचिया मंडळा,
तूं हास काला मला, मी तुलाही सदा हासतों गर्विता, चंचला;
हे आधिंनो व्याधिंनो ! माक्षिकांनो ! तुम्ही बापुडीं कायशी दुर्बल !

हे विश्व सारे विहारास माझ्या, पुरेसे न होईल, शंका नको,
हा मर्त्य, हा देहकारानिवासी, बळे हीन हा, कांहिं कोणी बको !
मी मर्त्य, मी मृत्युला जिंकणारा! जगी धूळ, मी दिव्यता उज्ज्वल !

मी ओळखीलें मला पूर्ण; आतां कशाला मला पाहणे आरसे ?
माझ्यापुढें नित्य आत्मानुभूती; पटावे दुजे तर्क आतां कसे ?
मी ईश्वराच्या जगत्कारणाच्या, खरी हेतुची पूर्तता मंगल !

— ना. वा. टिळक

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)
3 comments:
Thank you for sharing such a inspiring poem with us
ओजस-तेजस
वयाच्या बाराव्या वर्षी वाचली ही कविता, आज अर्धशतक गाठले, तरी त्याच तन्मयतेने आणि भक्तीभावाने नतमस्तक झालो कविवर्य टिळकांपुढे.पुढील सहस्त्राधिक वर्ष ही अक्षरे चिरंजीव राहतील हा विश्वास आहे.नैराशाने ग्रासलेल्याने एखाद्या स्तोत्रासारखे हिचे पठण करावे त्याच्या मनातील तम नाहीसा होईल.. खात्रीने.
असो या दिव्यतेजाचे स्तवन संपणे नाही.
Excellent. I am reading this poem after 25 year i.e. after doing my 10th. This was part of 10th curriculum
Post a Comment