[श्लोक : कामदाछंद
आस ही तुझी फार लागली II
दे दयानिधे बुद्धि चांगली II
देवूं तूं नको दुष्ट वासना II
तूंच आंवरीं माझिय मना II १ II
देह देउनी तूंच रक्षिसी II
अन्न देउनी तूंच पोशिशी II
बुद्धि देउनी काम सांगशी II
ज्ञान देउनी तूंच तारिशी II २ II
वागवावया सर्व सृष्टिला II
शक्ति बा असे एक तूजला II
सर्वशक्ति तूं सर्वदेखणा II
कोण जाणिजे तुझिया गुणा II ३ II
नाम रूप हें तूजला नसे II
तय तुला मुखें वर्णावे कसें II
आदि अंत ना मध्यही तुला II
तूंच दाविशी मार्ग आपुला II ४ II
माणसें आम्ही सर्व लेकरें II
माय बाप तूं हें असे खरें II
तूझिया कृपेवीण इश्वरा II
आसरा आम्हां नाहीं दूसरा II ५ II
तूंच आहसी आमुची गती II
देईं आमुतें उत्तमा मती II
प्रर्थितों तुला जोडुनी करां II
हे दयानिधे कीं कृपा कराII ६ II
– साने गुरुजी
आस ही तुझी फार लागली II
दे दयानिधे बुद्धि चांगली II
देवूं तूं नको दुष्ट वासना II
तूंच आंवरीं माझिय मना II १ II
देह देउनी तूंच रक्षिसी II
अन्न देउनी तूंच पोशिशी II
बुद्धि देउनी काम सांगशी II
ज्ञान देउनी तूंच तारिशी II २ II
वागवावया सर्व सृष्टिला II
शक्ति बा असे एक तूजला II
सर्वशक्ति तूं सर्वदेखणा II
कोण जाणिजे तुझिया गुणा II ३ II
नाम रूप हें तूजला नसे II
तय तुला मुखें वर्णावे कसें II
आदि अंत ना मध्यही तुला II
तूंच दाविशी मार्ग आपुला II ४ II
माणसें आम्ही सर्व लेकरें II
माय बाप तूं हें असे खरें II
तूझिया कृपेवीण इश्वरा II
आसरा आम्हां नाहीं दूसरा II ५ II
तूंच आहसी आमुची गती II
देईं आमुतें उत्तमा मती II
प्रर्थितों तुला जोडुनी करां II
हे दयानिधे कीं कृपा कराII ६ II
– साने गुरुजी
12 comments:
कवी साने गुरूजी
Nice
खरंच का? किती अप्रतिम रचना आहे.
खुप मस्त
I need this in song mp३ format
कसे करु
I am not having in MP3 format.
अप्रतिम......🙏🙏🙏
खूप छान मनात स्पर्श करते.
या कवितेच गाणं नाही का? असेल तर सांगा
Mala hya kavitechi mp३ havi ahe plz asel tar dya mazya १varshachya mulila mazi aai hi kavita mhanun dakhavte tichya say hi havi ahe plz khup chan ahe hi kavita
ही कविता श्रीधर फडके यांच्या स्वरात ध्वनिमुद्रित आहे
शैलेषजी आपल्याकडील ध्वनिमुद्रित कविता पाठवल्यास वाचकांना उपलब्ध करून देता येईल .
Post a Comment