(पतिनिधनानंतर अल्पावधीतच बापडीवर एकुलत्या एक मुलाचे निधन पाहण्याचा प्रसंग आल्यावर असा भ्रम होणार नाही ?)
हे कोण बोललें बोला ? 'राजहंस माझा निजला !'।। ध्रुo ।।
दुर्दैवनगाच्या शिखरीं । नवविधवा दुःखी आई !
तें हृदय कसें आईचे । मी उगाच सांगत नाहीं !
जें आनंदेही रडतें ! दु:खात कसें तें होई––
मांडीवर मेलें मूल । तो हृदया धक्का बसला ।
होउनी कळस शोकाचा । भ्रम तिच्या मानसीं बसला ।
मग हृदय बधिरची झालें । अति दुःख थिजवि चित्ताला ।
जन चार भोवतीं जमले । मृत बाळा उचलायाला ।
तो काळ नाथनिधनाचा । हतभागि मना आठवला ।
तो प्रसंग पहिला तसला । हा दुसरा आतां असला !
करूं नका गलबला अगदीं । लागली झोप मम बाळा !
आधीच झोंप त्या नाहीं । खेळाचा एकच चाळा !
जागतांच वार्यासरसा । खेळाचा घेईल आळा !
हें दुध जरासा प्याला । आतांसा कोठें निजला !
डोळयाला लागे डोळा । कां तोच भोंवतीं जमलां ?
जा ! नका उठवु वेल्हाळा । मी ओळखतें हो सकलां !
कां असलें भलतें सलतें । बोलतां अमंगळ याला ?
छबकडयावरुनि माझ्या या । ओंवाळुनि टाकिन सकलां !
घेतें मी पदराखालीं । पाहूंच नका लडिवाळा !
हें असेंच सांगुनि मागें । नेलात जिवाचा राजा !
दाखविलाहि फिरुनी नाहीं । नाहिंत कां तुम्हां लाजा ?
न्यावयास आतां आलां । राजहंस राजस माझा !
हे काळे कुरळे केश । खेळतात डोक्यावरतीं ।
ही दृष्टि पहा मम वदनीं । नेहमी अशी ही असती ।
हें तेज अशा रत्नांचे । झालें का आहे कमती ?
या अर्ध्या उघडया नयनीं । बाळ काय पाहत नाहीं ?
या अर्ध्या उघडया तोंडीं । बाळ काय बोलत नाहीं ?
अर्थ या अशा हंसण्याचा । मज माझा कळतो बाई !
या माझ्या मानससरसी । सारखें प्रेमजल वाही ।
त्या तरंगलहरींवरतीं । राजहंस पोहत राही ।
सारखा पोहुनी दमला । मग मला भुकेला बाही !
ते वैकुंठेश्वर गेले । पदीं त्यांच्या अर्पायाला ।
ही अखंड या अश्रूंची । वैजयंति मोहनमाळा !
मी करित असें केव्हाची । धरुनियां उराशी बाळा ।
हें असें जाहलें म्हणतां । तरि देवचि निजला कां हो ?
जरि निर्दय होऊनि निजला । आळवीन फोडुनि टाहो ।
कीं असा पोटचा गोळा । पोटातचि देवा राहो !
जरि दूत यमाचे आले । लाडक्यास या न्यायाला ।
ते निष्ठुर असले तरिही । भुलतील पाहुनी याला ।
हृदयाचें होऊनि पाणी । लागतील चुंबायाला ।
हें सर्वस्वाचें फूल । त्या भंवतीं झालां गोळा ।
मी बघतें–– कधिंचा आहे । त्यावरतीं तुमचा डोळा !
एकदां करावा त्याचा । वादानें चोळामोळा !
जरि होउ नये तें झालें । तरि सोडणार या नाहीं !
पाळणाहि रुततो ज्याला । प्रेमें जरि निजवी आई !
तो देह खांच दगडांत– छेः । नको नको ग बाई !
जरि काळाचाहि काळ । बाळाला न्याया आला !
तरि नाहीं मी द्यायाची । या जीवाच्या जीवाला !
सारखीं गाउनी गाणीं । निजवीन कल्पवर याला !
तन्मुखी स्वमुखी ठेवोनी । चुंबिलें एकदा फिरुनी ।
पाहिलें नीट निरखोनी । झणिं तीही गेली निजुनी ।
मग माता-पुत्रांवरि त्या । तरु गाळिती कोमल पानें ।
ढाळिती लता निज सुमनें । पशुपक्षिहि रडती गानें ।
दशदिशा दगडही कढती । मन दुभंगुनी शोकानें ।
– राम गणेश गडकरी
("वाग्वैजयंती" - जुलै, १९१२)

हे कोण बोललें बोला ? 'राजहंस माझा निजला !'।। ध्रुo ।।
दुर्दैवनगाच्या शिखरीं । नवविधवा दुःखी आई !
तें हृदय कसें आईचे । मी उगाच सांगत नाहीं !
जें आनंदेही रडतें ! दु:खात कसें तें होई––
हें कुणी कुणा सांगावें !मग ऐकावें या बोला । 'राजहंस माझा निजला ! '।। १ ।।
आईच्या बाळा ठावें
प्रेमाच्या गांवा जावें––
मांडीवर मेलें मूल । तो हृदया धक्का बसला ।
होउनी कळस शोकाचा । भ्रम तिच्या मानसीं बसला ।
मग हृदय बधिरची झालें । अति दुःख थिजवि चित्ताला ।
तें तिच्या जिवाचें फुल !वाटतची होतें तिजला । 'राजहंस माझा निजला !' ।। २ ।।
मांडीवर होत मलूल !
तरि शोकें पडुनी भूल––
जन चार भोवतीं जमले । मृत बाळा उचलायाला ।
तो काळ नाथनिधनाचा । हतभागि मना आठवला ।
तो प्रसंग पहिला तसला । हा दुसरा आतां असला !
तें चित्र दिसे चित्ताला !मग रडुनि वदे ती सकलां । 'राजहंस माझा निजला !' ।। ३ ।।
हें चित्र दिसे डोळयांला !
निज चित्र चित्तनयनांला,
करूं नका गलबला अगदीं । लागली झोप मम बाळा !
आधीच झोंप त्या नाहीं । खेळाचा एकच चाळा !
जागतांच वार्यासरसा । खेळाचा घेईल आळा !
वाजवूं नका पाऊल !मग झोंपायाचा कुठला ! राजहंस माझा निजला ! ।। ४ ।।
लागेल तया चाहूल !
झोंपेचा हलका फूल !
हें दुध जरासा प्याला । आतांसा कोठें निजला !
डोळयाला लागे डोळा । कां तोच भोंवतीं जमलां ?
जा ! नका उठवु वेल्हाळा । मी ओळखतें हो सकलां !
तो हिराच तेव्हां नेला !लपवीन ! एकची मजला ! राजहंस माझा निजला ! ।। ५ ।।
हिरकणीस आता टपलां !
परि जिवापलिकडे याला––
कां असलें भलतें सलतें । बोलतां अमंगळ याला ?
छबकडयावरुनि माझ्या या । ओंवाळुनि टाकिन सकलां !
घेतें मी पदराखालीं । पाहूंच नका लडिवाळा !
मी गरीब कितीही असलें ।खपणार नाही हो मजला ! राजहंस माझा निजला ! ।। ६ ।।
जरि कपाळ माझें फुटलें ।
बोलणें तरी हें असलें––
हें असेंच सांगुनि मागें । नेलात जिवाचा राजा !
दाखविलाहि फिरुनी नाहीं । नाहिंत कां तुम्हां लाजा ?
न्यावयास आतां आलां । राजहंस राजस माझा !
हा असा कसा दृष्टावा ?पाहुनी गरिब कोणाला । राजहंस माझा निजला ! ।। ७ ।।
कोणत्या जन्मिचा दावा ?
कां उगिच गळा कापावा––
हे काळे कुरळे केश । खेळतात डोक्यावरतीं ।
ही दृष्टि पहा मम वदनीं । नेहमी अशी ही असती ।
हें तेज अशा रत्नांचे । झालें का आहे कमती ?
कानांत नाचती डूल,मी असाच झांकिन याला । राजहंस माझा निजला ! ।। ८ ।।
तोंडावर हंसरें फूल,
जीवाची घालुनी झूल ––
या अर्ध्या उघडया नयनीं । बाळ काय पाहत नाहीं ?
या अर्ध्या उघडया तोंडीं । बाळ काय बोलत नाहीं ?
अर्थ या अशा हंसण्याचा । मज माझा कळतो बाई !
हें हंसे मुखावर नाचे !इतुकेंहि कळे न कुणाला–– । राजहंस माझा निजला ! ।। ९ ।।
जणुं बोल दुग्धपानाचे !
की मुक्या समाधानाचे !
या माझ्या मानससरसी । सारखें प्रेमजल वाही ।
त्या तरंगलहरींवरतीं । राजहंस पोहत राही ।
सारखा पोहुनी दमला । मग मला भुकेला बाही !
नयनांच्या शिंपांमधुनी,मोत्यांचा चारा असला । राजहंस खाउनी निजला ! ।। १० ।।
अश्रूंचे मौक्तिकसुमणी,
मी दिले तया काढोनी,
ते वैकुंठेश्वर गेले । पदीं त्यांच्या अर्पायाला ।
ही अखंड या अश्रूंची । वैजयंति मोहनमाळा !
मी करित असें केव्हाची । धरुनियां उराशी बाळा ।
कौस्तुभ हा माळेमधला !दैत्याहुनि दैत्यचि झालां ! राजहंस माझा निजला ! ।। ११ ।।
हृदयाचें कोंदण याला !
तो चोराया कां आलां ?
हें असें जाहलें म्हणतां । तरि देवचि निजला कां हो ?
जरि निर्दय होऊनि निजला । आळवीन फोडुनि टाहो ।
कीं असा पोटचा गोळा । पोटातचि देवा राहो !
ही कुर्हाड आकाशाची,हा तुमचा कावा सगळा ! राजहंस माझा निजला ! ।। १२ ।।
मजवरती पाडायाची,
नाहीच कल्पना त्याची,
जरि दूत यमाचे आले । लाडक्यास या न्यायाला ।
ते निष्ठुर असले तरिही । भुलतील पाहुनी याला ।
हृदयाचें होऊनि पाणी । लागतील चुंबायाला ।
मी मुका असा घेतांना––सुख खुपे काय डोळयांला? राजहंस माझा निजला ! ।। १३। ।
हा पहा–– पुन्हां हंसला ना ?
कां अशा फिरवितां माना ?
हें सर्वस्वाचें फूल । त्या भंवतीं झालां गोळा ।
मी बघतें–– कधिंचा आहे । त्यावरतीं तुमचा डोळा !
एकदां करावा त्याचा । वादानें चोळामोळा !
सर्वांच्या मनिचा लाहो,कीं हेंही कळेना मजला । राजहंस माझा निजला ! ।। १४ ।।
हाच ना ? स्पष्ट बोला हो,
मी इतकी वेडी का हो––
जरि होउ नये तें झालें । तरि सोडणार या नाहीं !
पाळणाहि रुततो ज्याला । प्रेमें जरि निजवी आई !
तो देह खांच दगडांत– छेः । नको नको ग बाई !
हृदयाची खणुनी खांच,जा ! जाउनि सांगा काळा । 'राजहंस माझा निजला !' ।। १५ ।।
झांकिन मी बाळ असाच,
दुःखांचे फत्तर साच !
जरि काळाचाहि काळ । बाळाला न्याया आला !
तरि नाहीं मी द्यायाची । या जीवाच्या जीवाला !
सारखीं गाउनी गाणीं । निजवीन कल्पवर याला !
जा ! करा आपुलें काळे !मी निजतें घेउनि याला ! राजहंस माझा निजला !" ।। १६ ।।
माझेही दमले डोळे !
प्राणांचें पसरुनि जाळे––
सांगुनी असें सकलांशीं । मृत बाळा उराशीं धरुनी ।––– ––– –––
तन्मुखी स्वमुखी ठेवोनी । चुंबिलें एकदा फिरुनी ।
पाहिलें नीट निरखोनी । झणिं तीही गेली निजुनी ।
मग पुन्हां कधी ती उठली,'' बोलेल कोण या बोला । राजहंस माझा निजला !" ।। १७ ।।
जाणीव कुणा ही कुठली ?
परि मति या प्रश्नें हटली––
मग माता-पुत्रांवरि त्या । तरु गाळिती कोमल पानें ।
ढाळिती लता निज सुमनें । पशुपक्षिहि रडती गानें ।
दशदिशा दगडही कढती । मन दुभंगुनी शोकानें ।
दुमदुमतें स्थळ तें अजुनी,ऐकाल याच बोलाला–– "राजहंस माझा निजला !" ।। १८ ।।
त्या एकच करुणागानीं,
जा जाउनि ऐका कानीं !
– राम गणेश गडकरी
("वाग्वैजयंती" - जुलै, १९१२)

2 comments:
अप्रतिम काव्य
मराठी भाषेतील सर्वात जास्त गुण व दोष असणारी कविता!
Post a Comment