जैसी हरळांमाजिं रत्नकिळा l
किं रत्नांमाजिं हिरा निळा l
तैसी भाषांमाजिं चोखळा l
भाषा मराठी ll१ll
जैसी पुष्पांमाजिं पुष्प मोगरी l
किं परिमळांमाजिं कस्तुरी l
तैसी भाषांमाजिं साजिरी l
मराठिया ll२ll
पखियांमधें मयोरु l
रुखियांमधें कल्पतरू l
भाषांमधें मान थोरु l
मराठियेसि ll३ll
तारांमधें बारा राशी l
सप्त वारांमाजिं रवि-शशी l
या दीपिंचेया भाषांमधें तैसी l
बोली मराठिया ll४ll
– फादर थॉमस स्टीफन्स
किं रत्नांमाजिं हिरा निळा l
तैसी भाषांमाजिं चोखळा l
भाषा मराठी ll१ll
जैसी पुष्पांमाजिं पुष्प मोगरी l
किं परिमळांमाजिं कस्तुरी l
तैसी भाषांमाजिं साजिरी l
मराठिया ll२ll
पखियांमधें मयोरु l
रुखियांमधें कल्पतरू l
भाषांमधें मान थोरु l
मराठियेसि ll३ll
तारांमधें बारा राशी l
सप्त वारांमाजिं रवि-शशी l
या दीपिंचेया भाषांमधें तैसी l
बोली मराठिया ll४ll
– फादर थॉमस स्टीफन्स