पांखरांची शाळा भरे पिंपळावरती
चिमण्यांची पोरें भारी गोंगाट करती ! ll १ ll
उतरते उन, जाते टळुनी दुपार
पारावर जसा यांचा भरतो बाजार ! ll २ ll
बाराखड्या काय आई, घोकती अंगणी ?
उजळणी म्हणती काय जमूनी रंगणी ! ll ३ ll
तारेवर झोके घेती बसूनी रांगेत
भुर्रकन इथे तिथें उडती मौजेत ! ll ४ ll
खेळकर किती, नको कराया अभ्यास
परीक्षेत कां न आई व्हायची नापास ? ll ५ ll
लक्ष यांचे पांगलेलें पेरूच्या बागेत
मास्तरच यांना हवे आमुचे रागीट ! ll ६ ll
पावसाळ्यातही शाळा आमुची न गळे
गळकी गं शाळा यांची, भिजती सगळे ll ७ ll
रविवारी, सणावारी आमुच्यासारखी
यांना नाही सुट्टी, भली मोडली खोड की ! ll ८ ll
यांच्याहून आम्ही आई शहाणे, नव्हे का ?
गप्प शाळेमधीं, कधीं धरितो न हेका ll ९ ll
होतों पास आम्ही, देती दिपोटी बक्षीस
मौज काय सांगू ? मिळे सुट्टीही शाळेस ! ll १० ll
— ग. ह. पाटील
टीप : पाठ्यपुस्तकामध्ये सहाव्या कडव्यातील ''लक्ष यांचे पांगलेलें..................आमुचे रागीट' या संपूर्ण ओळी गाळल्या आहेत.

आठव्या कडव्यातील 'सुट्टी' हा शब्द 'सुटी' असा असून तोच शब्द दहाव्या कडव्यात मात्र 'सुट्टी असाच आहे.
2 comments:
अतिशय सुंदर....उपक्रम...हार्दिक शुभेच्छा...
आम्हाला होती ही कविता...
कितवित होती ते आता आठवत नाहीये...
Thanku
Post a Comment