[मंदारमाला]
सृष्टी तुला वाहुनी धन्य ! माते, अशी रुपसंपन्न तूं निस्तुला !
तूं कामधेनू ! खरी कल्पवल्ली ! सदा लोभला लोक सारा तुला;
या वैभवाला तुझ्या पाहुनीयां, मला स्फूर्ति नृत्यार्थ होते जरी,
सामर्थ्य नामीं तुझ्या आर्यभूमी, तसें पाहिलें मी न कोठें तरी !
माते ! महात्मे तुझे, तत्ववेत्ते, तुझे शूर योद्धे, तुझे सत्कवी,
श्रेणी जयांची सदा माझिया गे ! मना पूजनीं आपुल्या वाकवी !
यांची यशें ज्या नव्या सद्गुणांना मला अर्पिती, ध्येय ते गे जरी,
सामर्थ्य नामीं तुझ्या जन्मभूमी, तसें पाहिलें मी न कोठें तरी !
तूझ्या महोदार सारस्वताच्या महासागरीचा जरी मीन मी
झालों, तरी गे ! तृषा मन्मनाची कधींही कधींही न होणें कमी !
आई ! गुरूस्थान अंती जगाचें तुझें ! यांत शंका न कांही जरी
सामर्थ्य नामीं तुझ्या जन्मभूमी,तसें पाहिलें मी न कोठें तरी !
वारा तुझ्या स्पर्शनें शुद्ध झाला, मला लाधला ! भाग्य हें केवढें !
माते ! स्वयें देशि जें अन्नपाणी, सुधा बापुडी कायशी त्यापुढें !
तूं बाळगीशी मला स्कंधिं-अंकीं ! सुखाची खरी हीच सीमा पुरी !

सामर्थ्य नामीं तुझ्या हें मला जें दिसे प्रेमयोगें अगे हिंदभू
तें पूर्णतेला झणीं प्राप्त व्हावें, म्हणोनी करी योजना ही प्रभू
रोंवी तुला आंग्लभूपालकाच्या किरीटामधें कीं तुझी उन्नती
व्हावी खरी; तूं जगत्कारणाची पुरी ओळखीं प्रेमयुक्ता मती.
— नारायण वामन टिळक
'टिळकांची कविता'' या संग्रहात शेवटचे कडवे वगळलेले आहे.

4 comments:
अभिनंदन! :-) आपल्या ब्लोगने चटका दिला. शाळेतले दिवस आठवले. आणि आठवणीत हरवलेल्या कवितांना उजाळा दिला. — रेमी डिसोजा
धन्यवाद! खूप आठवणीतील कविता मिळाल्या. एका कवितेच्या शोधात आहे, ती मिळू शकेल का?
माझाच हिंद देश नाही दूजा कुणाचा
ही ती कविता आहे, जी कुठेही मिळत नाही.
धन्यवाद,ही कविता बालपणी आकाशवाणीवर ऐकलेली,खूप आवडीने ती गातही होतो.पुन्हा तो आनंद मिळवून दिल्याबद्दल मनापासून आभार
ही कविता माझ्या मोठ्या बहिणी ला होती. त्यांना सारस्वत पाठमाला हे पुस्तक होतं. जुनी आठवण जागी झाली. बरेच दिवस ही कविता शोधत होतो.
Post a Comment