डोंगरी शेत माझं गं मी बेनू किती?
आलं वरीस राबून मी मरावं किती?
कवळाचे भारे बाई गं घेऊन चढावं किती,
आडाचं पाणी बाई गं पाणी वढावं किती?
घरात तान्हा माझा गं तान्हा रडंल किती,
तान्ह्याचं रडं ऐकून पान्हा येईल किती?
आलं आलं वरीस जमिन नांगरुन,
उभं पीक नाचे सोन्यानं फुलून
पर एक मेला सावकार ठोला,
हिसकून घेतो बाई सोन्याचा गोळा
असं उपाशी राहून गं आम्ही मरावं किती?
म्हागाइनं बाई घातला हैदोस
गळा आवळी बाई सावकारी फास
कुनाचे देऊ आन कुनाचं ठेवू
अशीच वर्सावर वर्स जातील किती?
या संसारा बाई सांजी येईना
रक्त गाळून अंगा धडूत मिळंना
कष्टाचं फळ बाई पदरांत पडंना
टीचभर पोटाला, हातभर देहाला जपावं किती?
अक्षय ऱ्हाया कुंकू कपाळा
संसार वेलीच्या फुलवाया फुला
रुप नवं आणू माय धरतीला
तोडू जुलमाचे काच, हे रावणी फास,
एकीचं निशाण हाती.
— नारायण सुर्वे
आलं वरीस राबून मी मरावं किती?
कवळाचे भारे बाई गं घेऊन चढावं किती,
आडाचं पाणी बाई गं पाणी वढावं किती?
![]() |
चित्रकार : अशोक जाधव, चिंचोली सांगली |
तान्ह्याचं रडं ऐकून पान्हा येईल किती?
आलं आलं वरीस जमिन नांगरुन,
उभं पीक नाचे सोन्यानं फुलून
पर एक मेला सावकार ठोला,
हिसकून घेतो बाई सोन्याचा गोळा
असं उपाशी राहून गं आम्ही मरावं किती?
म्हागाइनं बाई घातला हैदोस
गळा आवळी बाई सावकारी फास
कुनाचे देऊ आन कुनाचं ठेवू
अशीच वर्सावर वर्स जातील किती?
या संसारा बाई सांजी येईना
रक्त गाळून अंगा धडूत मिळंना
कष्टाचं फळ बाई पदरांत पडंना
टीचभर पोटाला, हातभर देहाला जपावं किती?
अक्षय ऱ्हाया कुंकू कपाळा
संसार वेलीच्या फुलवाया फुला
रुप नवं आणू माय धरतीला
तोडू जुलमाचे काच, हे रावणी फास,
एकीचं निशाण हाती.
— नारायण सुर्वे
5 comments:
सर,
"कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतानो थोडासा गुन्हा करणार आहे" हि नारायण सुर्वेंची कविता पोस्ट करा.
"कामगार आहे मी...." ही नारायण सुर्वेंची कविता माझ्याकडे आहे पण ती बालभारतीत होती कि नाही हे माहित नसल्यामुळे पोस्ट केलेली नाही.
Mla pn vachayla avdel kamgar ahe mi hi kavita
अभ्यासलेल्या अनेक कवित पुन्हा वाचायला मिळाल्या,फार आनंद झाला.
पण मी चौथी ते सातवीच्या दरम्यान अभ्यासलेली एक कविता शोधत आहे (साधारणपणे 2014-17);
जी पावसावर लिहीलेली आहे आणि त्यात वळीवाचं नाहितर मुळसधार पावसाचं चित्र रेखाटलेलं होतं.
कृपया शोधण्यास मदत कराल का?
दिगंबर, आपण सुचवलेल्या कवितेच्या काही ओळी किंवा एखादे कडवे दिल्यास कविता शोधणे सोपे जाईल.
Post a Comment