[जाति : अवनी]
अजुनि कसे येती ना, परधान्या राजा ?
किरकिरती रातकिडे, झाल्या तिन्हिसांजा ll ध्रु.ll
उशिर होइ काढाया, गाईंच्या धारा
शालु हिरा कालवडी, देती हुंकारा
टवकारिती कान जरी, वाजे दरवाजा
किरकिरती रातकिडे, झाल्या तिन्हिसांजा ll १ ll
वाट तरी सरळ कुठें, पांदीतिल सारी ?
त्यांतुनि तर आज रात्र, अंधारी भारी
आणि बैल कसल्याही बुजती आवाजा
किरकिरती रातकिडे, झाल्या तिन्हिसांजा ll २ ll
'जेवणार मी पुढ्यांत' घाली मधु रुंजी
झोपेने पेंगुळली तरि न निजे मंजी
आणि किती करति आंत-बाहेरी ये-जा
किरकिरती रातकिडे, झाल्या तिन्हिसांजा ll ३ ll
निवल्यावर हुरड्याच्या उसळीस न गोडी
लवकर कां सोडिती न मोट तरी थोडी
अधिकाधिक खाली-वर होइ जीव माझा
किरकिरती रातकिडे, झाल्या तिन्हिसांजा ll ४ ll
गुरगुरला तो पिसाळ काल जरा कांही
म्हणती त्या मेल्याला काळिज कीं नाही !
परि पाठीराखी ती आहे अष्टभुजा
किरकिरती रातकिडे, झाल्या तिन्हिसांजा ll ५ ll
— यशवंत