रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशिवाली ll ध्रु. ll
तांबेकुल वीरश्री ती,
नेवाळकरांची कीर्ति,
हिंदभूध्वजा जणु जळती,
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ll १ ll
घोडयावर खंद्या स्वार,
हातात नंगि तलवार,
खणखणा करीत ती वार,
गोऱ्यांची कोंडी फोडित, पाडीत वीर इथें आली ll २ ll
कडकडा कडाडे बिजली,
शत्रुंची लष्करे थिजलीं,
मग कीर्तिरूप ती उरली,
ती हिंदभूमिच्या, पराक्रमाची इतिश्रीच झाली ll ३ ll
मिळतील इथें शाहीर,
लववितील माना वीर,
तरु, झरे ढाळीतिल नीर,
ह्या दगडां फुटतिल जिभा, कथाया कथा सकळ काळी ! ll ४ ll

— भा. रा. तांबे
1 comment:
Good. But you should correct the ह्रस्व-दीर्घ errors. To wit:
झाशीवाली
(Yes, that's the title according to तांबे यांची समग्र कविता, despite the subsequent use of the ह्रस्व in the poem for वृत्त reasons.)
करित ती वार,
गोऱ्यांची कोंडी फोडित पाडित वीर इथे आली,
तरु झरे ढालितिल नीर,
ह्या दगडां फुटतिल जिभा कथाया कथा सकळ काळी,
Etc.
Post a Comment