सर्वात्मका, शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना
तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना ॥ धृ. ॥
सुमनांत तू, गगनांत तू
तार्यांमध्ये फुलतोस तू
सद्धर्म जे जगतामध्ये
सर्वांत त्या वसतोस तू
चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना ॥ १ ॥
श्रमतोस तू शेतामध्ये
तू राबसी श्रमिकांसवे
जे रंजले वा गांजले
पुसतोस त्यांची आसवे
स्वार्थावीना सेवा जिथे तेथे तुझे पद पावना ॥ २ ॥
न्यायार्थ जे लढती रणी
तलवार तू त्यांच्या करी
ध्येयार्थ जे तमी चालती
तू दीप त्यांच्या अंतरी
ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्या तू साधना ॥ ३ ॥
करुणाकरा, करुणा तुझी
असता मला भय कोठले ?
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पाउले
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना ॥ ४ ॥
— कुसुमाग्रज
तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना ॥ धृ. ॥
सुमनांत तू, गगनांत तू
तार्यांमध्ये फुलतोस तू
सद्धर्म जे जगतामध्ये
सर्वांत त्या वसतोस तू
चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना ॥ १ ॥
श्रमतोस तू शेतामध्ये
तू राबसी श्रमिकांसवे
जे रंजले वा गांजले
पुसतोस त्यांची आसवे
स्वार्थावीना सेवा जिथे तेथे तुझे पद पावना ॥ २ ॥
न्यायार्थ जे लढती रणी
तलवार तू त्यांच्या करी
ध्येयार्थ जे तमी चालती
तू दीप त्यांच्या अंतरी
ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्या तू साधना ॥ ३ ॥
करुणाकरा, करुणा तुझी
असता मला भय कोठले ?
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पाउले
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना ॥ ४ ॥
— कुसुमाग्रज
11 comments:
या कवितेचा पूर्ण भावार्थ पाठवा
Ya कवितेचा आर्थ
कोणत्या काव्य संग्रहात समाविष्ट आहे?
ही आमची प्रार्थना होती आज मी वाचल्यावर माझे डोळे पाणावले येतील का हे दिवस....
सर्वात सुंदर मनाला शांती मिळवून देणारी पार्थमा
👌👌👌❤️❤️
Very nice👌👌👌
Ya kavitetla shabdarth pathva
अप्रतिम भावार्थ असेल रचना 👍😃
सृजनत्व समानार्थी शब्द
प्रत्यक्ष ईश्वराशी संवाद करणारी कविता आहे.खूप मनापासून म्हणावी वाटते. या सुंदर रचनेला खूप खूप धन्यवाद 🙏
Post a Comment