ओतीत विखारी वातावरणी आगकधी लवचिक पाते खड्गाचे लवलवते,
हा वळसे घालित आला मंथर नाग,
मधुनीच उभारी फणा, करी फूत्कार
ये ज्वालामुखिला काय अचानक जाग !
कधी वज्र धरेवर गगनातुन कडकडते,
कधी गर्भरेशमी पोत मधे जरतार
प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते.
मार्गावर याच्या लवत तृणाची पातीचालला पुढे तो– काय ऐट! आनंद!
पर्णांवर सुमने मोडुनी माना पडती
थरथरती झुडुपे हादरती नववेली
जग गुलाम सारे या सम्राटापुढती.
अग्नीचा ओहळ ओहळतो जणु मंद,
टाकली यमाने कट्यार वर कनकाची
चालली बळींचा वेध घेत ही धुंद.
वा तांडव करता सोम प्राशुनि काली–चालला पुढे तो लचकत मुरडत मान,
रक्तात नाहली, शिरमुंडावळ भाली,
थयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या,
हे कंकण निखळुनि पडले भूवर खाली.
अवतरे मूर्तिमान् मल्हारातिल तान
चांचल्य विजेचे, दर्याचे गांभीर्य
चालला मृत्युचा मानकरीच महान!
हा थांब– कुणाची जाळिमधे चाहूल,थबकलाच जागी सर्प घालुनी वळसा,
अंगार– कणापरि नयन कुणाचे लाल,
आरक्त ओठ ते ध्वजा जणू रक्ताच्या,
रे नकूल आला ! आला देख नकूल !
रिपु समोर येता सोडुनि अन् आडोसा,
भूमीस मारुनी मागे तीव्र तडाखा,
घे फणा उभारुन मरणाचा कानोसा.
पडलीच उडी ! की तडितेचा आघात!रण काय भयानक– लोळे आग जळात!
उल्केपरि तळपत कण्यात घुसले दात,
विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प,
फुंफाट करी अन् पिशापरी त्वेषात !
आदळती, वळती, आवळती क्रोधात,
जणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व
आषाढघनांशी झुंजे वादळवात !
क्षणि धुळीत गेली वहात ती विषधारसंग्राम सरे, रक्ताचे ओघळ जाती,
शतखंडित झाले ते गर्वोन्नत ऊर
विच्छिन्न तनूतुनि उपसुनि काढुनि दात
वाऱ्यापरि गेला नकुल वनातुनि दूर.
आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती,
पिंजून कापसापरी पडे तो नाग,
ते खंड गिळाया जमले किटक भोती!
— कुसुमाग्रज
No comments:
Post a Comment