(जाति-हरिभगिनी)
कांठोकांठ भरु द्या पेला, फेंस भराभर उसळूं द्या !
प्राशन करितां रंग जगाचे क्षणोक्षणीं ते बदलूं द्या !
अमुच्या भाळीं कटकट लिहिली सदैव वटवट करण्याची,
म्हणेल जग आम्हांस मद्यपी, पर्वा कसली मग याची !
जिव्हेचीं बंधनें तर ढिलीं करा तीव्र या पेयानें,
यदुष्णतेने द्यावापृथ्वी द्रवुनि मिसळती वेगानें !
कांठोकांठ भरुं द्या पेला, फेंस भराभर उसळूं द्या ! II १ II
सोमाचा रस वेदकाळच्या ऋषिवर्यांनी उसळीला,
शेष तयाचा द्या तर लौकर पिपासु जे त्या आम्हांला !
औचित्याच्या फोल विवेका ! जा निघ या दुरवस्थेनें
अम्हा घेरिले म्हणुनी घेतों झिंगुनिया या पानानें !
क्लृप्तीची मग करुनी नौका व्योमसागरावरि जाऊं,
उड्डरत्नें या गरिब धऱेला तेथुनि फेंकुनियां देऊं !
कांठोकाठ भरूं द्या पेला, फेंस भराभर उसळूं द्या ! II २ II
पद्यपंक्तिची तरफ आमुच्या करीं विधीनें दिली असे,
टेंकुनि जी जनताशीर्षावरी जग उलथुन या देउ कसें !
बंडाचा तो झेंडा उभवुनी धामधूम जिकडे तिकडे –
उडवुनि देउनि जुलमाचे या करुं पहा तुकडे तुकडे !
‘महादेव ! हरहर !’ समराचा गर्जत तो वार्यावरती
येउनि घुमतो अमुच्या कणीं – “निजती ते ठारची मरती !”
कांठोकांठ भरूं या पेला, फेंस भराभर उसळूं द्या ! II ३ II
- केशवसुत (मुंबई, १८९६)

होउनियां मग दंग मनी,परिसुनि त्यांचे शब्द, रुढिचे दास झणीं ते खवळूं द्या !
व्हावे तें आणा ध्यानीं,
गा मग सुचतिल तीं गाणीं;
कांठोकांठ भरुं द्या पेला, फेंस भराभर उसळूं द्या ! II १ II
सोमाचा रस वेदकाळच्या ऋषिवर्यांनी उसळीला,
शेष तयाचा द्या तर लौकर पिपासु जे त्या आम्हांला !
औचित्याच्या फोल विवेका ! जा निघ या दुरवस्थेनें
अम्हा घेरिले म्हणुनी घेतों झिंगुनिया या पानानें !
क्लृप्तीची मग करुनी नौका व्योमसागरावरि जाऊं,
उड्डरत्नें या गरिब धऱेला तेथुनि फेंकुनियां देऊं !
अडवतील जर देव, तरीदेवदानवां नरें निर्मिलें, हें मत लोकां कवळूं द्या !
झगडूं त्यांच्याशी निकरीं,
हार न खाऊं रतीभरी !
कांठोकाठ भरूं द्या पेला, फेंस भराभर उसळूं द्या ! II २ II
पद्यपंक्तिची तरफ आमुच्या करीं विधीनें दिली असे,
टेंकुनि जी जनताशीर्षावरी जग उलथुन या देउ कसें !
बंडाचा तो झेंडा उभवुनी धामधूम जिकडे तिकडे –
उडवुनि देउनि जुलमाचे या करुं पहा तुकडे तुकडे !
‘महादेव ! हरहर !’ समराचा गर्जत तो वार्यावरती
येउनि घुमतो अमुच्या कणीं – “निजती ते ठारची मरती !”
उठा ! उठा ! बांधा कमरा !छंद फंद उच्छृंखल अमुचे स्तिमित जगाला ढवळूं द्या !
मारा किंवा लढत मरा !
सत्त्वाचा ‘उदयोऽस्तु’ करा !
कांठोकांठ भरूं या पेला, फेंस भराभर उसळूं द्या ! II ३ II
- केशवसुत (मुंबई, १८९६)
No comments:
Post a Comment