"लतांनो" ! सांगू का तुम्हां, उद्या श्रीराम येणार !
वनाला सर्व ह्या आता, खरा आनंद होणार !
तुम्हां कोठूनीयां ठावा, कसा श्रीराम तो आहे
सुखछंदी झरा तेथे, सदाचा वाहतो आहे
उद्या पाहाल डोळ्यांनी, सुखाचा पूर्ण आराम
मुखे लागाल घोकाया, "जय श्रीराम श्रीराम"
बघोनी नाथ हर्षाने, मला उन्माद येईल
नका आणू मनामाजी, चुकोनी दोष होतील
लतांनो ध्याल ना पुष्पे? झर्यांनो ध्याल ना पाणी?
पहा! ही अर्पिली कैसी, फळे ह्या थोर वृक्षांनी
नव्हे - कोठून ही उष्ठी? जराशीं चावलेली हिं!
कडू कच्ची फळे रामा, कशी देईन गं बाई?
उद्या श्रीराम येऊ दे, तुम्हांला मीच दावीन
फळे ही त्यास अर्पोनी, सुखे त्यापायीं लोळेन
"जय श्रीराम श्रीराम! जय श्रीराम श्रीराम"
_ वा. गो. मायदेव

1 comment:
खूप छान कविता, शाळेशी संबंध संपल्यानंतर काल एका कीर्तनात (कुबेर बुवा) ऐकली आणि गुगलवर शोधाविशी वाटली, सु. 50 वर्षांनी ही कविता ऐकली, खूप छान वाटलं!
ही कविता कोणत्या इयत्तेला होती, कृपया कळवावे.
8007725980 - संजय चक्रदेव
धन्यवाद !
Post a Comment