A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

वाचकांच्या प्रतिक्रिया >>

लहानपणी शिकलेल्या सुंदर सुंदर कवितांचा अनमोल खजिना विनामुल्य उपलब्ध करुन दिल्याबद्दल आपले आभार कसे आणि किती मानावे हेच कळत नाही. बर्याच कविता मला अजुनही बर्यापैकी तोंडपाठ आहेत परंतु काहीतरी विसरून जाते आणि मग मन अस्वस्थ होते आणि सारखे विसरलेले शब्द आठवण्याचा प्रयत्न करते. विसरलेले कसेतरी आठवले तर होणारा आनंद अवर्णीय असतो. तुम्ही तर अश्या आनंदाचा अखंड झराच माझ्यसारख्या कवितांच्या वेड्यांना बहाल केला आहे ! त्यासाठी तुम्ही घेतलेल्या अपार मेहनतीला मानाचा मुजरा. तुमच्याकडुन अशाप्रकारे शारदेची सतत ऊपासना होत राहो हिच मनोकामना. परमेश्वर तुम्हांला आणि तुमच्या परिजनांना आशिर्वादीत करो, तुमचे जिवन सुखासमाधानाने, आनंदाने ओतप्रत भरून टाको हिच त्याच्याचरणी नम्र प्रार्थना.
— सुधाकर बागुल, कासारवाडी, पुणे
~~~~~~~~***~~~~~~~~
I may be senior by age but you are simply great. No one dares to take pains for doing such noble and tiring work. After reading these poems I forgot I was 58.

I went to my school it was changed all together for better, but I was not happy to see those changes. Only few age old trees and the soil of ground was of my time. I was staring at the building, looking if any corner recognises me. Somebody informed the principal he called me. I thought he took me for a thief or mad man or child picker. I told him purpose of my visit. He was a young man but he saw my wet eyes and recognised my feelings. Principal took me around the school introduced me to one class we parted with a cup of tea.

"Baa Neej Gade Nij LadivaaLaa" by Dattakavi was haunting my mind for 3-4 days. I read it fully first time in your compilation, in my school days perhaps we had one or two stanzas and may not have understood it's emotional contents. In my childhood my mother was to sung this poem. Fortunately, my mother is still alive, I asked her if we were so poor as described in the poem and if not why was she singing it? She replied, she was not knowing its meaning and we may not that much poor but, in those days such conditions were not rare. After that I gathered myself some how and came to ground and of course I stopped reading it. If I read it I will again go into depression. So pathetic description of poverty.

Today many poets are writing very good poems but these old poems are dear to us, closer to our hearts, they were around us as was our mother in our childhood.

You served Mayboli i.e. mother tongue in a big way. Really, you use the electronic media for a good work.
— Sharad Sapkal, Nagpur
~~~~~~~~***~~~~~~~~
वास्तव आणी स्वप्न, यातील फरक लहान मुलेच काय, तर आपल्यासारख्या जाणकारांना सुद्धा कळावा हा हेतु या बालभारती संकलनामागचा आहे. एवढ्या जुन्या कविता, त्यातील व्याकरण, अर्थपुर्ण शब्द, याकडे अभ्यासू वृत्तीने पहायला हवे. या कविता कुठेही एकाच ठिकाणी सहज उपलब्ध नाहित. तुम्ही त्या विनामुल्य उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार व कौतुक!
— Ms. Rajani Arankalle, Mumbai
~~~~~~~~***~~~~~~~~
बालभारती - 'हरवलेल्या क्षणांची फिरून पुन्हा साठवण' हा आपला अव्याहत सुरु राहणारा उपक्रम स्तुत्य आहे! मनापासून अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!
१९४९ ते ५६ या कालावधीत पुण्याच्या नूतन मराठी इंग्रजी शाळेमध्ये शिकत असताना, पाचवी सहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात एक कविता होती.
"बुलबुल गवई कुणी मारिला?- चिमणा म्हणतो मी!
मला वाटते कवी माधवानुज यांची ती कविता असावी. मला ती आजही पाठ आहे पण शेवटच्या काही ओळी मात्र आठवत नाहीत. आपण ती कविता सापडवून द्यायला साहाय्य करू शकाल का?
— माधव वझे, पुणे.
~~~~~~~~***~~~~~~~~
आज अपघाताने जालावर तुमचा बालभारती - मराठी कविता ब्लॉग सापडला. थेट बालभारतीच्या पुस्तकात नेऊन पोहोचवलंत. शाळेतल्या ओळखीच्या एकाहून एक सुंदर कविता, एका ठिकाणी वाचायला मिळणे म्हणजे मोठीच मेजवानी आहे.
— गौरी बार्गी, मुंबई
~~~~~~~~***~~~~~~~~
Aaj sakalchya (17 October 2011) Maharashtra Times chya Pune avruttit tumchya blogbaddal vachle ani lagech tumcha blog pahila. To pahun zalela anand vyakt karaNe kathiN aahe. Etakaa sundar upakram rabavlyabaddal abhinandan ani dhanyavad !! Hya junya kavita vachna ani punha vachna – ha ek farach sundar anubhav aahe.
— Mr. Jagadish Palnitkar, Pune
~~~~~~~~***~~~~~~~~
Sorry for writing in English. If I try to write in Marathi, I will not be able to complete it. Excellent work done by you. Congratulations for the endeavor.
However, in the poem Gadi Ali Gadi Ali one line "Jayache Ka Door Kothe Bhur Bhur Bhur Kothehi Ja Neu thethe Door Door Door" should be added.
— Mr. Pradeep Mandke, Mumbai
~~~~~~~~***~~~~~~~~
I just came across to your blog of 'Balbharati Kavita'. I really appreciate your sincere efforts for refreshing school days memories. Can you provide me info that where I can get these Old Balbharati Text books?
— Kavita Pharande
~~~~~~~~***~~~~~~~~
आपला बालभारती - मराठी कविता हा ब्लॉग मला फार आवडतो. शालेय वयात शिकलेल्या कविता आठवणे ही मलाही फार आनंददायी गोष्ट वाटते. आपण यासाठी जे परिश्रम घेत आहात ते खूप कौतुकास्पद आहेत. अनेक कविता मला तुमच्या या ब्लॉगवरून अर्धवट आठवणार्‍या मिळाल्या आणि खूप आनंद झाला.
मला इयत्ता ८ वी मध्ये असताना १९७४ साली शिकलेली एक कविता अर्धवट आठवते ती मला पूर्ण मिळू शकेल का? कवी ग. ल. ठोकळ यांची ती कविता होती. ’गढी’ नावाची. सुरुवात आठवत नाही, पण एकेकाळी वैभवसंपन्न असणार्‍या पण आता विदीर्ण अशा गढीचे वर्णन त्यात आहे.
— उन्मेष इनामदार
~~~~~~~~***~~~~~~~~
I have recently read the compilation titled 'Athvanitil Kavita'. I must say, it had the power to make me nostalgic. I could remember most of the poems learnt during school days from 1969 to 1979. It was a wonderful journey.
— Mr. Sunil Kanade, Haryana
~~~~~~~~***~~~~~~~~
आपण तयार केलेला बालभारती कविता संग्रह पहिला. खूपच आवडला, आपण अतिशय सुंदर जमवा-जमावी केली आहे. पुन: एकदा लहानपणीच्या कविता आठवण करून दिल्या आपल्या संग्रहाने. यात मी लहान असताना माझे वडील माझ्या साठी ज्या कविता म्हणायचे त्या सुद्धा सापडल्या, परत बालपणामध्ये गेल्याचा आनंद मिळाला, जसे बा निजगडे निज माझ्या बाळा, ...धावत धावत आला बालक, ..खबरदार जर टाच मारुनी. खूपच डोळे पाण्याने भरून आले. मला आजून एक कविता माझे वडील माझ्यासाठी म्हणायचे ती मला मिळाली नाही ... " मी पाळीला तो हा पक्षी ... पाहता अश्रू येती या नयनांशी " अशा काही कवितेतील अस्पष्ठ ओळी आठवतात पण लेखक/लेखिका वा कवितेचा आरंभ आठवत नाही.
— राकेश रविंद्र पाटील
~~~~~~~~***~~~~~~~~
Really a great job!!! There is no words for your balbharti Marathi kavita blogs. Balbharti is one of the memory I preserved in one corner of my heart.
— Mr. Anil R. Dambe
~~~~~~~~***~~~~~~~~
गुगलवर काहीतरी शोधताना बालभारतीतील कवितांचा खजिना (हा ब्लॉग) हाती लागला आणि प्रचंड आनंद झाला. या उपक्रमाबद्दल तुमचे मानावे तेवढे आभार थोडे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मी रविंद्रनाथांच्या "इच्छा" या कवितेच्या शोधात होते. इयत्ता दुसरीत शिकलेली ही कविता मला खूप आवडायची, पण त्याच्या शेवटच्या काही ओळी मला आठवत नव्हत्या. ही कविता बघून अगदी हरवलेला खजिना मिळाल्यासारखं वाटलं. या कवितेचं दुसरं कडवं मात्र गहाळ आहे.
— Ms. Deepa Joshi
~~~~~~~~***~~~~~~~~
While going through this - my first reaction was – “I burst into tears” remembering my school days and realized, what I have missed in my life, which will never come again. I whole heartedly appreciate the efforts taken by you in making this available to the people like us in this world, who have enjoyed real life in the schooldays.
— Mr. Shashikant Dhale, Pune
~~~~~~~~***~~~~~~~~
आपण तयार केलेला बालभारती कविता संग्रह पहिला. आपण अतिशय सुंदर जमवा-जमावी केली आहे. आपल्या संग्रहाने पुन: एकदा लहानपणीच्या कविता आठवण करून दिल्या. यात मी लहान असताना माझे वडील माझ्या साठी ज्या कविता म्हणायचे त्या सुद्धा सापडल्या, परत बालपणामध्ये गेल्याचा आनंद मिळाला, जसे बा निजगडे निज माझ्या बाळा, ..धावत धावत आला बालक, ... खबरदार जर टाच मारुनी. खूपच डोळे पाण्याने भरून आले.
— राकेश रविंद्र पाटील
~~~~~~~~***~~~~~~~~
I was honestly amazed with how well this blog was done, Congratulations and thanks for sharing this info to all your visitors.
— Unknown
~~~~~~~~***~~~~~~~~
Many many thanks for the innovative idea of collection of these beautiful poems. I would call it the TRESURE in Marathi literature.
— Ms. Sneha Mahajan, Pune
~~~~~~~~***~~~~~~~~
Aapla balbharticha sangrah mhaNaje ek khajinach milalyacha aanand zala. ShaLa shikat astanna sagali pustaka nit japun thevali jaat naahit, pan tyatalya aathawani vishesh karun kavita visarataa yet naahit. Mala nehami ase watayache ki aapan aata balbhartiche sagale pustake (pahili te dahawichi) vikat gheyvuya. Punyatach asalyaane balbhartichyaa kaaryaalayawarun jaataanna ha vichar anekda aala asel pan kadhi saadhi chaukashi karane jamale naahi. Pan tumachya sankalanacha khajina miLaalaa aaNi nakkich jan aali. Mazya dokyat asnari idea e- form madhe utravanyache aaNi tumachyaa surekh sankalanaache khup aabhar.
— Ms. ​Shallu Kulkarni, Pune
~~~~~~~~***~~~~~~~~
This is really a nostalgic collection for persons like me who have studied in Marathi and love this great language.
— Mr. Chandrashekhar B. Marathe, Mississauga Ontario L5A 4A1, Canada.
~~~~~~~~***~~~~~~~~
विश्वजालावर श्री सुरेश शिरोडकर यांचा उपक्रम स्तुत्य आहे पण काही गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे. रचनेत ह्रस्व - दीर्घ कडे लक्ष देणे गरजेचे आहे. ई-पुस्तकांतील चुका पण 'चिरंजीव' होतात याचे भान ठेवले पाहिजे. ई-पुस्तकांतील अनुक्रमणिकेला काही-तरी सुसंवाद ठेवल्यास कोणतीही कविता शोधणे सोपे होईल [९९% वाचक हे पुस्तक एका विशिष्ट कवितेच्या शोधातच वाचणार हे लक्षात ठेवावे].
— गणेश विनायक सावरचौदाखडीकर
~~~~~~~~***~~~~~~~~
If you get the poem "Amrataru" in future please send me without forgetting. I really appreciate your efforts foe the great collections. I am so glad when I see this site. I can't express my gladness in words. I was searching many of these poems from long ago. It makes me remind 'maze balpan' ...
खरच खूप मस्त वाटले. मी त्यातल्या काही कविता माझ्या छोट्या मुलीला म्हणुन दाखवल्या. तिला पण त्या खूप आवडल्या. आजकल इंग्रजी मेडियम मधल्या मुलांना हा अमुल्य ठेवा नाही मिळत.
— Ms. Sushma Mone
~~~~~~~~***~~~~~~~~
​I can only say thank you for all the commendable efforts has been taken. It is a great collection. I may suggest to divide the poems into different groups like children (balgeet), bhakti, deshprem etc. It is equally important to pass on the heritage and treasure to younger generation.
— Dr Shrirang Dabhade, GP, Liverpool, UK.

~~~~~~~~***~~~~~~~~
आपला ब्लॉग वाचला अन प्रेमातच पडलो. का ते वेगळे सांगायची गरज नाही. शाळेतले अख्खे दिवस पुन:एकवार भेटले, अख्खे बालपणच भेटले म्हटले तरी चालेल.
ब्लॉग सहज चाळताचाळता एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे माधव ज्यूलियनांच्या बालभारतीतल्या काही कविता संकलनात घ्यायच्या राहून गेल्यात. इ.स. २००१-२ च्या वेळी ८वी-९वीच्या पुस्तकात "महासिंधु याला असे पाठिराखा, तसे साह्य सह्याचलाचे कडे ।
खडे दुर्ग साल्हेर फोंडा परांडा अशेरी असे दक्ष चोहीकडे । "
हा श्लोक असलेली त्यांची एक कविता होती, ती दिसली नाही.
— निखिल बेल्लारीकर.
~~~~~~~~***~~~~~~~~
आपला हा बालभारतीचा प्रकल्प मनाला इतका भावला आहे की जेव्हा जेव्हा अगदी एकटे वाटते, तेव्हा तेव्हा तुम्ही या माध्यमातून आम्हांस बालपणात घेऊन जाता आणि परत मन लहान होऊन खेळायला लागते, बागडायला लागते. आभार मानावे तितके कमीच पडतील. या आपल्या अतुलनीय कार्यामुळेच आपणास अजून एक सुचवावेसे वाटते कि, पाठशाळेत असतांना बालभारतीच्या पुस्तकात काही खूप सुंदर पाठ होते. तर असे काही निवडक पाठ आपण संकलित करू शकाल तर अजून एक सुंदर प्रकल्प होईल यात शंका नाही. तुम्ही हे नक्की करू शकाल म्हणून आपल्याला सुचविण्याची हिम्मत केली.   
— सौ शामला अभिजीत क्षीरसागर
~~~~~~~~***~~~~~~~~
आपण संकलन केलेली बालभारतीची दुसरी आव्रुत्ति मी इंटरनेटवरुन डाउनलोड केली आणि वाचून एकदम शालेय जीवन अनुभवले. लहानपणीच्या जगात गेलो. गुरुजींच्या/बाईंच्या आठवणीत विसावलो. जेव्हा जेव्हा मी विमनस्क असतो तेव्हा कविता वाचून गुणगुणतो. सगळा शीण जातो व ताजातवाना होतो.
तुमचे शतशः आभार!
— रमेश रामचंद्र राणे, मुंबई.
~~~~~~~~***~~~~~~~~
Thanks for collection of old syllabus poems which I study in school and I always tried to get back my old memory. Today I find my old days come back and my lost treasure. Thanks lots again.
— Ganesh Sharma
~~~~~~~~***~~~~~~~~
मी पण मराठी कवितांचा चाहता आहे. अगदी 'बघ आई आकाशात सूर्य हा आला......' येथ पासून आम्हाला कवितांची गोडी लागली ती आमच्या आगरकर बाईंमुळे. त्यांनी 11 वि त असताना 'सुवर्णंनिधी' नावांनी स्वतंत्र वही करावयास लावली होती. चांगल्या कविता रसग्रहणासाठी.
आता 2013 ला मी सेवानिवृत्त झालो आणि कविता प्रेमाने परत उचल खाल्ली आणि शोध सुरू झाला. 'अरुण' कवितेची आम्हास 6-8 कडवी होती कोणती ते आठवत नाही. तुमच्या कविता प्रेमाला आणि ब्लॉगला मी हातभार लावू शकतो. सेवानिवृत्त असल्याने मी या कामासाठी वेळ काढेनच पण आपणास काही कविता ब्लॉगसाठी टंकलिखित करून हव्या असल्यास जरूर पाठवा मी आपणास ती मदत देवू शकेन.
— मोहन क्षीरसागर, पुणे
~~~~~~~~***~~~~~~~~
सर्वात अगोदर मला आपल्याला खूप खूप धन्यवाद द्यायचे आहेत ते यासाठी की, आपण जे कविता संकलनाचे कार्य हाती घेतले ते फारच कौतुकास्पद आहे आणि मला त्याचा खूप अभिमान वाटतो. त्याचे कारण असे की, तुम्ही आमच्या म्हणजे रसिकांच्या जीवनातील ते सुवर्ण क्षण जीवंत करण्याचे महान कार्य केले आहे. त्याबद्दल तुमचे शतशः आभार. आणि हो मला आपल्याला अजून काही कविता सुचवायच्या आहेत. त्यातली मला आताच आठवलेली कविता म्हणजे ज्ञानश्वरांची अभंगवाणी. त्यातल्या काही ओव्या अश्या होत्या;
"पार्था जयाचिया ठायीं । वैषम्याची वार्ता नाहीं ।
रिपुमित्रां दोहीं । सरिसा पाडु ।।"
— Dhanraj Popalghat
~~~~~~~~***~~~~~~~~
​"बालभारती - आठवणीतल्या कविता"
ते रम्य बालपण, आमचे मराठीचे माने सर, माझी शाळा, आमची बोर्डिंग, माझी आई, माझा गाव... सर्व काही डोळ्यासमोर तरळत आहे! तुमचे खूप खूप आभार हा सर्व ठेवा एकत्रित करून दिल्याबद्दल. बालभारती आता आयुष्याची शिदोरी म्हणून जपणार.
— Balaji Patil
~~~~~~~~***~~~~~~~~
'Tumchya ya sunder ani kautukaspad kamasathi amchya pidhiche shatashah dhyanywad.'
In our get together or in picnic we all used to recollec those poems but no one used remember the whole wordings. And no one has thought of doing collection of those poems. Really thank you very much for your efforts. Whatever was their in our mind which we couldn't do it. You have done it and gave us real enjoyment of our life.
— Nutan Salvi
~~~~~~~~***~~~~~~~~
काही वर्षांपुर्वी मी "शेवटचा लाडू" या कवितेचा शोध घेत होतो पण तेंव्हा ती internet वर उपलब्ध नव्हती, आज अचानक आठवण झाली आणी पाहिली तर दरम्यानच्या काळात ती इथे upload झाली होती. As someone who left home at the age of 17 for higher education and never really went back for good, this poem always had a special place in my heart. I had referred to this poem in my letter to my parents when the लाडूचा डबा my mom gave me to take with was about to finish. Reading it after all those years, was both emotionally rewarding and challenging, it was tough the hold back the moisture wanting to come out of the eyes!!! You just made my day. आज इतक्या वर्षांनी ही कविता पूर्ण रूपात वाचताना नकळत डोळे भरून आले.
— Sudhir Oak
~~~~~~~~***~~~~~~~~
सर्वप्रथम http://balbharatikavita.blogspot.in ह्या ब्लॉगसाठी तुमचे किती आणि कसे आभार मानू तेच कळत नाहीये. ह्या ब्लॉगच्या रूपाने तुम्ही माझ्या बालपणीच्या खजिन्याची चावी माझ्या हातात दिली आहे. पाठ्यपुस्तकात असलेल्या ह्या कवितांसाठी मनाचा एक कोपरा नेहमीच हळवा होऊन जातो. त्या निमित्ताने त्या कवितांना लावलेल्या चाली आणि शिक्षक आजही आठवणीत आहेत. ह्या सगळ्या गत आठवणींना उजाळा मिळतो आहे आणि खूप खूप छान वाटतं आहे.

माझी तुम्हाला एक छोटी विनंती आहे, कवितांबरोबर त्यातील धडे आणि चित्रे देखील माझ्या आठवणीत आहेत आणि ते पुन्हा वाचावेसे आणि बघावेसे वाटत आहे. तुमच्याकडे जर ह्यातील काही पुस्तके उपलब्ध असतील तर कृपया मला त्यातील धडे मिळतील का? अगदी फोटोकॉपी सुद्धा चालेल.
— मीरा
~~~~~~~~***~~~~~~~~
​"बालभारती - आठवणीतल्या कविता" हे पुस्तक योगायोगाने माझ्या आत्ता वाचनात आले व आपण केलेल्या प्रचंड 'साहसी' उपक्रमाचा सुलभ रीतिने वाचताना भावनावश होउन गेलो! तुम्हाला त्रिवार घन्यवाद व शतश: प्रणाम.
गेले ५-६ दिवस 'भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे' हे गाणं (की कविता?) मनात घोळतयं व 'श्रीकृष्ण जन्माचा गोंधळ उडे' पर्यंत आठवतयं. संपूर्ण कविता/गाणं कुठे मिळेल का?
— भास्कर देवस्थळे, चिंचवड
~~~~~~~~***~~~~~~~~
मी शिरीष रा. पोफळे, राहणार लातूर.माझे वय ५९ वर्षे आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून आम्ही लातुरात 'बालविहार' नांवाची एक बालवाडी चालवत आहोत. जिची स्थापना माझ्या आईने, कै.विमल रामकृष पोफळे हिने केली असून माझी आई हि आदरणीय कै.ताराबाई मोडक यांची विद्यार्थिनी होती.
आपल्या 'बालभारती मराठी कविता' या संकेतस्थळाला भेट दिली आणि मन अगदी पार 'भूतकाळात' फिरून आलं हो. तुम्ही त्या 'पिंपळ पानावर' (ती सुद्धा बालपणात घेऊन जाणारी खूण आहे) लिहिलेलं 'हरवलेल्या क्षणांची फिरून पुन्हा साठवण' हे वाक्य किती 'समर्पक' आहे याचा प्रत्यय आला.
— शिरीष रामकृष्ण पोफळे, लातूर
~~~~~~~~***~~~~~~~~
तुमचा मराठी कवितांचा ब्लॉगस्पॉट वाचला, उत्तम उपक्रम राबवलाय. पुष्कळ हरवलेल्या कविता मिळाल्या या ब्लॉगस्पॉटवर मन अगदी भारावून गेल जुन्या कवितांचा पुन्हा एकदा आस्वाद घेवून.
— RAGINI BELE
~~~~~~~~***~~~~~~~~
पां.श्रा .गोरे यांची 'विटंबना'शिर्षक असलेली कविता वाचायला मिळेल का? लहानपणी दहावीच्या अभ्यासक्रमात वाचली होती. आपल्या ब्लाँगने थेट शालेय जीवनात नेऊन या धकाधकीच्या वातावरणातील चिंताग्रस्त अवस्थेतून चिंतामुक्त अवस्थेत अलगद नेऊन ठेवले.
— ऊध्दव गावंडे
~~~~~~~~***~~~~~~~~
सर्वप्रथम आपण बालभारती या कविता संकलनासाठी घेतलेल्या मेहनतीला सलाम. मनापासून आभार.
मी ६वी किंवा ७वीत असताना बालभारतीच्या​ पुस्तकात "झपझप चाललेत नाजूक पाय" नावाची सुंदर कविता होती. घरातील सर्व भावंडात मोठ्या असलेल्या मुलीची आई आजारी पडल्यावर, शाळकरी पोरीने पार पाडलेली आईची भूमिका, डोळ्यात पाणी आणते. काही ओळी आठवत होत्या पण संपूर्ण कविता मिळत नव्हती. अनेक वर्षांपासून शोधंत असलेली कविता, आज आपल्याकडून​ प्राप्त झाली. कविता वाचल्यानंतर त्यावेळचे सर्व संदर्भ आठवले.
— दिनेश कासवेद, पुणे.
~~~~~~~~***~~~~~~~~
मला हवी असलेली कविता तुम्ही लक्षात ठेवून, तीन वर्षांनंतरही आवर्जून पाठवलीत. मानले तुमच्यातील सातत्याने पूर्ण शोध घेणा-या प्रयत्नवादी अभ्यासकाला आणि तीन वर्षांनंतरही लक्षात ठेवून ईमेलद्वारे ती कविता माझ्या पर्यंत पोहोचवण्याच्या संवेदनशीलतेला. कविता पुन्हा वाचताना वाटले काही ओळी राहिल्या आहेत. पाठ्यपुस्तकात कडव्यांचा क्रम जसा होता तसा लिहून पाठवत आहे. पुस्तकात क्रम तुम्ही दिलेल्या कडव्यांसारखा होता.
— अजित गोखले
~~~~~~~~***~~~~~~~~
I was searching for a few Marathi poems which I had studied in my school days but I could not find on the internet for a long time. I, almost accidentally, came across to your blog and was extremely happy to find those poems on your blog.

Thanks a lot for such a wonderful collections.
— Nachiket Ashtaputre
~~~~~~~~***~~~~~~~~
तुम्ही दिलेल्या ब्लॉगवर कवी गोपीनाथ यांची 'रायबा' ही कविता मिळाली! ही कविता किती साधी, बाळबोध आणि भावपूर्ण आहे! शालेय मुलामुलींसाठी कसे लिहावे, तर ते असे! मी नवविमध्ये शिकत होतो तेंव्हा कवी गोपीनाथ तळवलकर पुणे आकाशवाणी केंद्रावर बालोद्यान विभागाचे प्रमुख होते. त्यावेळी ते मला प्रत्येक महिन्याला कार्यक्रमात भाग घेण्यासाठी बोलावीत असत. मी त्यांचा आवडता नट होतो.
— माधव वझे
~~~~~~~~***~~~~~~~~
वा! आज हे गाणं (विमान) ऐकण्याची खूप इच्छा होती, ऑडिओ नसल्यामुळे मी सहज Google वर शोधलं, खूप आनंद झाला तुमचा पोस्ट बघून. लहानपणी हे गाणं माझं आवडतं होतं. तुमच्यामुळे मला माझं आवडतं गाणं ऐकता नाही आलं तरी निदान वाचतां आलं.
— Apurvaa Patil
~~~~~~~~***~~~~~~~~
I just came across your blog 'Balbharti Marathi Kavita'. It got me missing my school day's thanks for that post. I am wondering if you can help me to get whole Marathi books from 1990 - 2000 which where in State Board syllabus back in days.
— Bhupesh Kolte
~~~~~~~~***~~~~~~~~
First of all A BIG BIG THANK to you for creating balbharati.blogspot.com.
From last so many years I was searching for all old Balbharati text books, was unable to find them. I also went to Balbharati Pune, they have all the books in library but they don't sell it. Few months back I came across Facebook page of Balbharati, there I found some old lessons and poems. It was such a great feeling. Few days back I came across to some other blog and I found some poems and lessons. Today I came across your blog and I could not resist myself for thanking you. Thanks a Lot from the bottom of my heart once again.
— Anand Gupta, Pune
~~~~~~~~***~~~~~~~~
अभिनंदन! आपल्या ब्लोगने चटका दिला. शाळेतले दिवस आठवले. आणि आठवणीत हरवलेल्या कवितांना उजाळा दिला.
— रेमी डिसोजा
~~~~~~~~***~~~~~~~~
बालभारती मराठी कविता, हा तुमचा ब्लोग वाचून खूप छान वाटले. ह्याच्यातील बऱ्याचश्या कविता, माझ्या सासुबाई म्हणत असतात. परंतू वयामुळे त्यांना आता सगळ्याच कविता पूर्णपणे आठवत नाहीत. त्यांच्यासाठी मी ६०-७० ह्या काळातील कविता शोधत असताना मला आपला ब्लोग सापडला. खूपच निवडक संग्रह आहे आपला. खूप आवडला. मी "ये गे घारी , माझ्या दारी" आणि " कुणी आलं कुणी गेलं, जिवाला वेड लावून गेलं" ह्या कविता शोधत आहे. कदाचित दुसरं गाणं असेल. पण संग्रही असेल तर नक्की पाठवा ही विनंती.
— प्रगती देसाई
~~~~~~~~***~~~~~~~~
आपल्या 'बालभारती मधील आठवणीतील कविता आत्ताच हाती लागल्या. मला भावणाऱ्या अनेक कविता त्यात असल्याने आपला ब्लॉग आवडला. 'भव्य हिमालय' ही अशीच एक माझी लाडकी आणि ती वाचताना काही गोष्टी खटकल्या. आपल्यावर टीका करण्याचा उद्देश नाही परंतु आपला उपक्रम ज्यास्तीत ज्यास्त परिपूर्ण व्हावा ह्या साठीच हे लिहीत आहे. गैरसमज नसावा.
१. पहिल्या कडव्यात 'तृणपात्यांना 'शब्द आहे तो 'त्रुणपात्यांना' असा लिहिला आहे .
२. दुसऱ्या कडव्यात 'जवळीक कायमची 'झाली' असे लिहिले आहे. माझ्या आठवणीप्रमाणे 'जडली ' असे हवे
३. तिसऱ्या कडव्यात माझ्या साठी राहील गाठी 'मराठ्याचा ' हट्ट खरा असे लिहिले आहे . मुळात ते 'मरहट्ट्याचा ' असे आहे असे वाटते
४. पाचव्या कडव्यात 'दृत ' हवे द्रुत नव्हे.
— श्रीनिवास केळकर, पुणे
~~~~~~~~***~~~~~~~~
आपण केलेला "बालभारती मराठी कविता स्मरणातील मराठी कवितांचा संग्रह", फारच उत्तम त्यामुळे जुन्या आठवणीनां उजाळा मिळला. कविता अकारविल्हे लावल्यामुळे कविता शोधायला सोपे आहे. मस्तच ! मी त्यामधे " यज्ञ शंभरावा होताच पुरता गमे भूपा झाली जन्म सफलता " ही कविता शोधत होतो. मिळाली नाही जर अपणास मिळालीतर संग्रहात भर घाला.
— विजय ज. बापट, मोंड देवगड, सिन्धुदुर्ग
~~~~~~~~***~~~~~~~~
मी तुमचा बालभारती कविता संग्रह वाचुन खुप आंनद झाला. बालपणीच्या गोष्टीना पुन्हा उजाळा मिळाला. मी पुन्हा बालजीवन जगले. कविता परत त्याच सुरांनी गुणगुणून पाय नाचू लागले. तुमच्यामुळे सर्व कविता एकत्रित वाचण्यास मिळाल्या त्याबद्दल मी आपली आभारी आहे.
— Neelam Deshpande
~~~~~~~~***~~~~~~~~
माय मराठीचा एवढा अनमोल खजिना आपण एवढ्या सहज उपलब्ध करून दिलात. आपले मनस्वी आभार. खूपच सुंदर ब्लॉग आहे.
— Unknown
~~~~~~~~***~~~~~~~~
खूप सुंदर कविता. माझ्या वडीलांच्या लहानपणी त्यांचा शाळेत शिकवलेली "झुळुक" कविता. आम्ही भावंड लहान असताना ही कविता म्हणून झोपवायचे. खूप छान चालीत कविता म्हणतात. आजही त्यांच्या आवाजात खूप गोडवा आहे. माझ्या मुलाला झोपवताना हीच कविता म्हणून झोपवितात. त्यांच्या काळात शिक्षक सगळ्या वर्गाला निसर्गाच्या सानिध्यात कविता शिकवायचे. ऐकूनच किती छान वाटते. आजही त्यांच्या सर्व कविता पाठ आहेत.
Anonymous
~~~~~~~~***~~~~~~~~
"चंदनाच्या विठोबाची" हि कविता आमच्या मॅडमनी शिकवली आणि शेवटी त्यांनी सांगितले कि, त्या बी रघुनाथ यांच्या कन्या आहेत. कविता खूप सुंदर आणि मनाला स्पर्षुन जाणारी आहे.
— Sujit Nilegaonkar
~~~~~~~~***~~~~~~~~
खुपच छान कविता आहे. खुप दिवस "पाळींव पोपटास" हि कविता शोधली. आज मिळाली अन खुप आनंद झाला. हा मराठीचा अनमोल ठेवा जपून ठेवल्याबद्दल आपले मनापासुन आभार.
Unknown
~~~~~~~~***~~~~~~~~
I am Bengali I born and brought up in Mumbai. I still remember when our music teacher taught this beautiful song (छोटेसे बहिण-भाऊ). Now I am teaching this poem to my student, it such a beautiful memory. They shock to know that I am singing this lovely poem.
Unknown
~~~~~~~~***~~~~~~~~
आपण "कृतज्ञता" ही कविता शेअर केल्याबद्दल आपले खूsssप खूप धन्यवाद! गेली कित्येक वर्षे मी ही कविता शोधत होतो. मी दुसरी इयत्तेत (१९५० साली) गावाकडे होतो त्यावेळी माझी ताई आम्हा सर्व भावंडांना आणि आमच्या आजीला तिच्या सुरेल व मधुर आवाजात ही करुण रसाने ओतप्रोत भरलेली कवीता म्हणून दाखवायची तेंव्हा आम्ही सर्वजण इतके भावनावश व्हायचो की, ताईस ती कविता कधीच पूर्ण म्हणता येत नसे. कारण आम्ही सर्वजण त्यावेळी मुसमूसून रडत असू. अर्थात ताईसही भावना आवरत नसत.
दोन वर्षांपूर्वी ताई गेली त्यावेळी तिच्या आठवणी सांगतांना तिच्या या कविता गायनाचा उल्लेख करताना फक्त *दूर आई राहीली कोकणात* येवढीच ओळ मला आठवत होती तेवढाच उल्लेख मी करु शकलो.
तेव्हापासून या कवितेच्या शोधात होतो आणि ती आज (२७/११/१९) मला आपल्यामुळे सापडली. त्यासाठी मी आपला खूsssप उतराई आहे.
कमलाकांत द. सावंत
~~~~~~~~***~~~~~~~~
एवढ्या सार्या बालभारतीमधील कविता वाचून मला खूपच आनंद झाला. अचानक मन बालपणात गेले. आणि सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मला वाटते अजूनही बर्याच कवितांचा समावेश यात झालेला नाही. अशा कवितांचा आडीयो जर ऐकायला मिळाला असता तर मी शिकवीत असलेल्या माझ्या शाळेतील मुलांना ह्या कविता ऐकवता आल्या असत्या. आता तर पाठ्यपुस्तकात चांगल्या गेयता असणाऱ्या कवितांचा समावेश फारच कमी प्रमाणात केला जात आहे त्यामुळे त्या मुलांना पाठांतर सुद्धा करता येत नाही.
दिगंबर भुते (एक प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद गोंदिया)
~~~~~~~~***~~~~~~~~
आपण जो‌ बालभारती कवितांचा संचय केला आणि ब्लोग बनवला ते वाचुन आम्हाला अतिशय आनंद वाटला. लहानपणी वाटे जसे वय वाढेल तसा आनंद ही वाढत जाईल. पण ते सत्य नाही. वयाप्रमाणे मानसिकता बदलली आणि आनंद दुसरीकडे शोधला जाऊ लागला. बालपणी च निखळ आनंद असतो हे मग कळाले. आम्ही ४ भाऊ बहिण व आई या आपल्या ब्लोगमधील कविता वाचुन मुग्ध झालो. आपल्या ह्या कार्याबद्दल आपले मानावे तेवढे आभार कमी आहेत.
प्रसाद ज्ञानेश्वर भेंडेकर, विद्युत अभियंता (दुबई)
~~~~~~~~***~~~~~~~~
आता माझे बालभारतीच्या पुस्तकाची कधीच भेट होणार नाही असे वाटतं हिते पण श्री गुगल देवाच्या कृपेने आज मला माझ्या वयाच्या 53 व्या वर्षी हे बालभारती पुस्तक व ती कविता पुन्हा प्राप्त झाली खूप खूप आनंद झाला. जाने कहा गये ओ दिन कोई मुझे लौटा दो ओ बचपनके दिन व कागज की कशती व बारिश का पानी.
— Unknown
~~~~~~~~***~~~~~~~~
I had came across your blog 'Balbharti' website today and for me it was moment like I find a expensive treasury of old good memories! which I have desperately searching for. Your efforts of compilation of Balbharti poems really extraordinary and deserves praise. Continuing the blog for more than ten years is not an easy task but you made this possible! More to write but I have no words!!!
— Rushikesh
~~~~~~~~***~~~~~~~~
Really I revived my childhood memories and I lost myself and began to sing these poems loudly in the morning near about 5.45 after my morning walk.and my daughter & son are getup and surprised and peering at me as though something is wrong with pappa. Really this morning was awful for me .Thanks friend you have given me peaceful moment for me.
— Unknown
~~~~~~~~***~~~~~~~~
सर तुम्ही एक वेगळा आनंद दिलात. सध्याचा काळ खूप अडचणीचा सुरू आहे आणि अशा सुंदर कविता जगण्याची एक नवीन उम्मेद देतात. 'चंदन' कविता मी माझ्या प्रिय आई बाबांना समर्पित करते. त्यांचे जीवनही मला चंदनाप्रमाणेच भासते. त्यांना मी हि कविता दाखवली तेव्हा ते खूप खुष झाले आणि मला कविता तालात म्हणून दाखवली. तुम्ही माझ्या ई मेलचा इतका positive reply दिलात.
— रागिणी बेले
~~~~~~~~***~~~~~~~~
"निज नीज माझ्या बाळा" हे अंगाई गीत माझी आई मला लहानपणी गाऊन झोपवित असे. आणि गंमत अशी की हेच अंगाई गीत माझ्या आईला माझी आजी गाऊन झोपवित असेल, आणि त्या पुढची गंमत अशी की माझ्या आजीला तिचे मोठे बंधू म्हणजे दत्तात्रय कुलकर्णी ही कविता गाऊन झोपवत असत. आज मी माझ्या मुलांना ही अंगाई कधीतरी आवर्जून गाऊन झोपण्याचा प्रयत्न करत असतो. असे हे चार पेढ्यानी गायलेलं गीत आजही गाताना डोळ्याच्या कडा ओले केल्याशिवाय राहत नाही. खरंतर गाणाऱ्या प्रत्येक जीवाच्या डोळ्यातून अश्रू बाहेर काढण्याच सामर्थ्य या कवितेला प्राप्त झालेल आहे. त्यांच्या या रचनेला अंतकरणातून सलाम.
— एक वाचक
~~~~~~~~***~~~~~~~~
First of all A BIG BIG THANKYOU to you for creating balbharati.blogspot.com. From last so many years I was searching for all old Balbharati text books, was unable to find them. I also went to Balbharati Pune, they have all the books in library but they don't sell it. Few months back I came across fb page of Balbharati, there I found some old lessons and poems. It was such a great feeling. Today I came across your blog and I could not resist myself for thanking you. Thanks a Lot from the bottom of my heart once again.
Anand Gupta
~~~~~~~~***~~~~~~~~
आपण मराठी माणसासाठी हा आमच्या पूर्वी शिकलेल्या जवळजवळ पंधरा पिढ्यांच्या शालेय वयातील अमूल्य असा कवितांचा ठेवा उपलब्ध करून दिलेला आहे त्या बद्दल शत:श धन्यवाद ! मी १९६३-६४ या वर्षी ईयत्ता चौथीला असतांना "नवीन वाचन" पुणे प्रकाशनचे पाठ्यपुस्तक आम्हांला होते. त्या पुस्तकातील सर्वच्या सर्व कविता जर मिळाल्यात तर मी आपला फारच उपक्रुत होईन ! त्या कविता आणि पाठांचा क्रम मला फारच स्मरणात होता. या कविता मिळविण्यासाठी सन १९८० पासून गेली चाळीस वर्षे झालीत सतत प्रयत्न करून आहे. एकदा तर पुण्याच्या जंगली महाराज रोड जंक्शन जवळील बालभारती पाठ्यपुस्तक प्रकाशन कार्यालयातही मी येऊन हताश होऊन परतलो आहे. माझा इतका जीव त्या कवितांत गुंतलेला आहे. तसे सुसंस्कारच या कवितांनी आमच्या पिढ्यांच्यावर घडविलेले आहेत. आपल्या कविता संग्रहाने मी फारच प्रभावीत झालो असून मी वर उल्लेखलेल्या १९६३ सालच्या ई. ४थी च्या नवीन वाचन पुस्तकातील सर्व कविता मिळतील ही आशा करतोय. पुस्तीतकाची रचनाच अशी अप्रतीम होती की, एक कविता आणि पुढे तीन पाठ धडे असत.
— श्री भानुदास रामचंद्र पोवार, पनवेल
~~~~~~~~***~~~~~~~~
मी तुमचा 'बालभारती कविता संग्रह' वाचुन खुप आंनद झाला. बालपणीच्या गोष्टीना पुन्हा उजाळा मिळाला. मी पुन्हा बालजीवन जगले. कविता परत त्याच सुरांनी गुणगुणून पाय नाचू लागेल. तुमच्यामुळे सर्व कविता एकत्रित वाचण्यास मिळाल्या. मला स्वतःच्या कविता लेख लिहीण्याचा छंद आहे.
— अक्षता परब
~~~~~~~~***~~~~~~~~
आपण जो‌ बालभारती कवितांचा संचय केला आणि ब्लोग बनवला ते वाचुन आम्हाला अतिशय आनंद वाटला आपले हे कार्य बद्दल आपले मानावे तेवढे आभार कमी आहेत.
प्रसाद ज्ञानेश्वर भेंडेकर, विद्युत अभियंता (दुबई)
~~~~~~~~***~~~~~~~~
सर्वप्रथम "बालभारती मराठी कविता" ;ह्या ब्लॉगसाठी तुमचे किती आणि कसे आभार मानू तेच कळत नाहीये. ह्या ब्लॉगच्या रूपाने तुम्ही माझ्या बालपणीच्या खजिन्याची चावी माझ्या हातात दिली आहे. पाठ्यपुस्तकात असलेल्या ह्या कवितांसाठी मनाचा एक कोपरा नेहमीच हळवा होऊन जातो. त्या निमित्ताने त्या कवितांना लावलेल्या चाली आणि शिक्षक आजही आठवणीत आहेत. ह्या सगळ्या गत आठवणींना उजाळा मिळतो आहे आणि खूप खूप छान वाटतं आहे. माझी तुम्हाला एक छोटी विनंती आहे, कवितांबरोबर त्यातील धडे आणि चित्रे देखील माझ्या आठवणीत आहेत आणि ते पुन्हा वाचावेसे आणि बघावेसे वाटत आहे.
मीरा
~~~~~~~~***~~~~~~~~
खूप दिवस झाले शेवटचा लाडू ही कविता आठवत होती,आज मी ७४ वर्षांचा आहे. ही कविता नेटवर उपलब्ध केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बऱ्याच वेळा वाटते की आपल्या वेळच्या कविता आणि जुनी गाणी काळाच्या उदरात नाहीश्या होणार का पण अश्या स्तुत्य उपक्रमामुळे त्या जिवंत राहतील. असाच एक श्लोक माझे वडील सांगायचे, जर कोणाला ती माहिती असेल तर सांगा, त्याच्या ओळी अश्या आहेत, "ती प्रभू रामचंद्रांची आहे सूर्य वंशी राघवे शी(नि) हा तुरंग सोडीला, ह्यासी जो धरील तो नृपात वीर आगळा, सैन्य हे करील युद्ध"
दिलीप देशपांडे
~~~~~~~~***~~~~~~~~
Recently I was searching for the poem "Marathi bhashechi prashasti". and I found it on your blog. and I got a chance to read your blog named 'Bar Bharati Kavita'. Since then I have wanted to appreciate your efforts to gather the priceless treasure of these poems. You are such an inspiration. It will take some time to enjoy the beauty and kindness of my mother tongue that is provided by you through this blog. May god bless you with a long life and lots of happiness. 
— Tushar Kale
~~~~~~~~***~~~~~~~~
आज अचानक आपल्या ब्लॉग वर सुप्रसिद्ध कवी वी द घा त्तथा दत्त यांची कविता वाचावयास मिळाली. सुमारे ७० वर्षांपूर्वी ही कविता आम्हास शाळेत शिकविली जात असे. त्यातला भावार्थ प्रत्यक्ष आमच्या त्यावेळच्या गरिबीशी जुळत होता. ही कविता पाठ होती पण कलोघात काही ओळी विसरल्या गेल्या; त्यामुळे ह्या कवितेचा शोध घेता घेता आपल्याकडे मिळाली. लिहून ठेवली आमच्या शालेय जीवनात अश्या सुंदर कविता आजही ओठावर आहेत.   सदरची कविता म्हणताना आईची मूर्ती माझ्यासमोर उभी राहिली अन डोळे पाझरू लागले. आज मी सुस्थितीत आहे, पण आई - वडील नाहीत. मनातील एक विलक्षण भावनेचा कप्पा आज आपल्यामुळे उघडला गेला. आपले मन:पूर्वक ऋण व्यक करतो. अधिक काय लिहू!
सुधाकर पोटे, शिरूर
~~~~~~~~***~~~~~~~~
आपला blog पाहिला. जुन्या कविता वाचून फ़ार् बरं वाटलं. खरंच, आमच्या लहानपणीची पाठ्यपुस्तकें म्हणजे एक ठेवाच आहे. आपण हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल शतशः धन्यवाद. आपल्याकडे वामन पण्डितांनी अनुवादित केलेल्या तीन शतकांची ecopy असेल काय? असल्यास, मिळेल काय?
कृष्णानन्द् मन्किकर