A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

4 November 2015

छोटेसे बहिण-भाऊ

छोटेसे बहिण-भाऊ,
उद्याला मोठाले होऊ
उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला,
नवीन आकार देऊ ll धृ ll

ओसाड उजाड जागा,
होतील सुंदर बागा
शेतांना, मळ्यांना, फुलांना फळांना,
नवीन बहार देऊ ll १ ll

मोकळ्या आभाळीं जाऊ,
मोकळ्या गळ्याने गाऊ
निर्मळ मनाने, आनंदभराने,
आनंद देऊ अन घेऊ ll २ ll

प्रेमाने एकत्र राहू,
नवीन जीवन पाहू,
अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे,
अनेक एकत्र होऊ ll ३ ll


— वसंत बापट

37 comments:

Unknown said...

KHUPACH CHAN KAVITA AHE.MALA MAZE BALPAN ATHAVLE

prabhakar jogale said...

कोणत्या इयत्तेत होती ही कविता ?

Unknown said...

ek number kavita ahe

Unknown said...

पाणी आल राव डोळ्यात ,
खुप छान ,👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

Hiwran said...

Mast@@@

Unknown said...

I am bengali I born n brought up in mumbai. I still remember when our music teacher taught ud this beautiful song ..now I am teaching this poem to my student...it such a beautiful memory...they shock to know that iiIam singing this lovely poem

Unknown said...

सुपर

Unknown said...

Lahan panachi atvan zhali��

Unknown said...

कितविला होति कविता

Vasimkhatik said...

3rd standard

Prashant said...

1 no.

Unknown said...

My sweet memories with this poem

prem jadhav said...

खूप छान! लहानपणी गुरूजी वदवून घ्यायचे !

Unknown said...

Mala khup avdati hi Kavita ase vatàte ki ajun balpan yave.i miss you , Balbharti.

Unknown said...

3rd std la kavita hoti hi mla khup aawdaychi

Unknown said...

त्या मुलीला हे गाणं ४ मध्ये होता

Unknown said...

मी आणि माझा लहान भाऊ नेहमी ही कविता म्हणायचो, ते दिवस आठवले लहानपणीचे

Unknown said...

मी आणि माझा लहान भाऊ नेहमी ही कविता म्हणायचो, ते दिवस आठवले लहानपणीचे

JyotiKanse said...

बालभारतीच्या सर्वच कविता खूप सुंदर होत्या.. आणि ही तर अप्रतिमच.. बालपणात हरवून टाकणारी.

Unknown said...

Thank you

Unknown said...

1st

Unknown said...

Mla pn
Maze balpn aatvle.

Anonymous said...

I also like this poem. This poem had enter my heart

Unknown said...

खुप छान आहे ही कविता
या कवितेमुळे पुन्हा बालपण आठवलं आणि माझी शाळा आठवली .

Unknown said...

Mp3 कुठे मिळेल?

Unknown said...

https://youtu.be/2Sz_Kj8lelo

Unknown said...

माझी आवडती ही कविता होती आहे आणि कायमची राहणार....... Salute u sir vasant bapat❤️❤️❤️

Prashant Adlinge said...

धन्यवाद !!

Unknown said...

Mi ani maza dada he khup bolaycho....


Aathwani jra jagya zalya

Govind Gaikwad said...

खूप छान कविता आहे. Back to school experience.

Unknown said...

जून ते सोन...... ते जग अन आत्ताचे जग खूप फरक आहे.....

Unknown said...

5 std madhe hoti hi Kavita khup ch mast aahe mala majhi shala aathavli

Unknown said...

Mala शाळेतील आला श्रावण श्रावण ही कविता हवी आहे

Unknown said...

मिळेल का

Unknown said...
This comment has been removed by a blog administrator.
Unknown said...

7th

Unknown said...

हा कविता मी विसरली होती..नेमकं माझ्या अभ्यास मी करत होती कि याची आठवण झाली आणि जेव्हा मी लहान होती तेव्हा मी हे कविता खूप गुणगणत होती मला ह्या कवित्याचा अर्थ कळत नव्हे कारण मी मराठी नाही (मी तेलुगू आहे त्यामुळे माझा मराठी अशा imperfect आहे) पण दहा वर्षांनंतर ही कविता परत वाचल्यानंतर असे वाटते की माझ्या हृदयाला काही टोचत आहे.. खूप सुंदर अर्थ आहे लहानपणी मी हे कविता असच मी गात असे पण आता अर्थ कळल्यावर खूप दुःख होते.. खरंच आहे आपलं मन बालपणात जसं शुद्ध होतं तसं शुद्ध राहत नाही, ते उद्ध्वस्त होते , काळजी, आपल्या आयुष्यातील घटना आपल्या मनाला आणि अंतःकरणाला डाग लावतात, आणि यासारख्या कविता आहेत ज्या आपल्याला या कठोर जगाने डागण्याआधी आपले मन किती सुंदर होता हे पाहण्यास मदत करतात, पण म्हटल्याप्रमाणे तुमच्यातील मूल कधीच मरत नाही, म्हणूनच मी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक सुंदर गोष्ट जे हे छोटे से बहीण भाऊ करायला हवे म्हणून गात आहे, मी करण्यासाठी प्रयत्न करेनi end my speech here :') it was difficult tryna write in marathi but atleast i tried heh