A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

5 October 2012

माय

जसा दिस बुडून जाई काळोखाचे राज्य असे
आम्ही बसू दरवाज्यात झोपडीत साधा दिवा नसे

घरोघरी दिवे लागत चुलीलाही जाळ लागे
भाकरी जात बडविल्या कुठे चून कुठे वांगे

नाकात जाई वास त्याचा पोटात असे अंधार सारा
तसे येई भडभडून आसवांच्या डोळ्यांत धारा

अंधाराला चिरत तेव्हा एक सावली जड येई
डोई तिच्या भारा असे, चालतांना तोल जाई

काळी काळी, कृश देह, ती असे माझी माय
वणवण सकाळपासून मोळीसाठी रानात जाय

वाट पाहात बसू कधी तिची, सारे आम्ही भाऊ
मोळी नसे विकत तेव्हा, भुकेलेले झोपी जाऊ

एकदा काय झाले कसे, आम्हा काही कळले नाही
माय आली पाय बांधून भळाभळा रक्त वाही

चावला साप मोठा काळा दोन बाया होत्य सांगत
फणा काढून मारला त्याने हळूच गेला निघून रांगत

माय पडली धरणीवर... गंडे झाले, मंत्र झाले, वैद आला
दिवस निघता निघता तिच्या देहातून प्राण गेला

हंबरडा फोडला आम्ही, तो विरला वाऱ्यावर
माय तरी सोडून गेली चिल्लेपिल्ले वाऱ्यावर

शोधते माझी नजर माय, आता मी उदास होतो
दिसता कृश मोळीवाली मोळी तिची विकत घेतो.



 वामन निंबाळकर (वामन सुदामा निंबाळकर)

26 comments:

प्रविण,(मांची ता.संगमनेर) said...

काळजाला हात घालणारी,रडवणारी कविता! ग्रामीण भागात अजूनही हे चित्र असेच आहे!

Atul said...

2-3 divas manatun nahi geli kavita..... Aapratim

Abhay said...

Padrat tichya mayecha sagar
Goad tiche bolne jadi sakhr....

Unknown said...

फार सूंदर काव्य

mukesh said...

Good poem

Unknown said...

काळजात कायम जागा असणारी अप्रतिम कवीची अप्रतिम कविता

Unknown said...

It is very good poem 🥰🥰

Unknown said...

कवींना सलाम

Unknown said...

हातावरचे पोट असताना, पोटातून ओठावर येणाऱ्या शब्दांनी वास्तवतेचे दर्शन घडविणारी, काळजाला भिडणारी कविता.....राजन लाखे, पुणे

Unknown said...

Ho bhau Manala Lagnari kavita aahe

Unknown said...

ही कविता आम्हाला 8 वी मध्ये होती आणि या कवितेला आम्ही चाल ही छान लावलेली 👌👌

Unknown said...

This poem has seprate fan base...🤩

Unknown said...

अश्रू शाळेतही आलेच होते आज पुन्हा तीच कविता वाचून आलेत ❤️

Great Lives said...

Heart touching poem.

Unknown said...

माय कवितेचे प्रश्न उत्तरे

Unknown said...

सौ उषाताई विठ्ठल कोळी (सरपंच ग्रामपंचायत lanjud जिल्हा बुलडाणा ) यांनी साहित्यिक वामन निबाळकर यांच्या नावाने वाचनालय व अभ्यासिका सुरू करण्याचे ठरविले आहे कारण निंबाळकर हेच माझ्या गावचे आहे त्यांना माझे त्रिवार अभिवादन
मेरा गाव मेरा देश

Unknown said...

भावार्थ

RajaniUrja said...

अप्रतिम काव्य

Unknown said...

Saransh in marathi

Unknown said...

Yah Poem Hame 8th me thi

Unknown said...

स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना मन थोड वेगळा विचार करायला लागत किंवा अभ्यास होत नाही तेव्हा ही कविता आठवायची मग बरोबर अभ्यास करावा वाटतो .....

शिवाजी घटकांबळे said...

ह्रदयाला हात घालणारी,हृदयस्पर्शी कविता!आई आणि तिच्या असंख्य आठवणी यासह डोळ्यात पाणी आणणारी कविता!!!

Unknown said...

Jevha mi 8th class la hoto tevha mala hya kavite mule tondi parikshet 10% paiki 10% marks hote tevha pasun hi kavita majhi favourite aahe...❤️🤗

Unknown said...

आईशिवाय जग रिकामं असतं
काही झालं तरी आईला काही होता कामा नये 🥺🥺

Unknown said...

lavkr nhi visrnr he kavita
so hearttouching...
i remember my aai when i read this..

Omkar kajvilkar Mumbai sion said...

ही कविता आम्हाला शाळेत होती इयत्ता तर आठवत नाही पण २०१२-१३ ची ला होती बहुतेक आज किती वर्षाने ही कविता वाचली पण आजपण तेवढेच अश्रू आले ❤️🥺