पहा टाकले पुसुनी डोळे गिळला मी हुंदका,
रणांगणी जा सुखे राजसा परतुनि पाहू नका !
झडे दुंदुभी झडे चौघडा
रणरंगाचा हर्ष केवढा
एकदाच जन्मात लाभते ही असली घटिका !
शकुनगाठ पदरास बांधुनी
निरोप देते तुम्हां हासुनी
आणि लाविते भाळी तुमच्या विजयाच्या तिलका !
या देशाची पवित्र माती
इथे वीरवर जन्मा येती
तोच वारसा तुम्ही पोचवा येणाऱ्या शतका !
— शांता शेळके
रणांगणी जा सुखे राजसा परतुनि पाहू नका !
झडे दुंदुभी झडे चौघडा
रणरंगाचा हर्ष केवढा
एकदाच जन्मात लाभते ही असली घटिका !
शकुनगाठ पदरास बांधुनी
निरोप देते तुम्हां हासुनी
आणि लाविते भाळी तुमच्या विजयाच्या तिलका !
या देशाची पवित्र माती
इथे वीरवर जन्मा येती
तोच वारसा तुम्ही पोचवा येणाऱ्या शतका !
— शांता शेळके
1 comment:
किती हृद्य कविता आहे ही ? कै. शांताबाई शेळके यांनी केव्हा बरे लिहिली आहे ? त्याची माहिती कृपया प्रसिद्ध करावी ही विनंती.
मंगेश नाबर.
Post a Comment