A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

20 October 2011

निज नीज माझ्या बाळा

बां नीज गडे, नीज गडे लडिवाळा !
निज नीज माझ्या बाळा ।। ध्रु० ।।

रवि गेला रे, सोडुनि आकाशाला,
धन जैसे दुर्भाग्याला.
अंधार वसे चोहिंकडे गगनांत,
गरिबाच्या जेविं मनांत.
बघ थकुनि कसा निजला हा इहलोक,
मम आशा जेविं अनेक.
खडबड हे उंदिर करिती,
कण शोधायातें फिरती,
परि अंती निराश होती;
लवकरि हेही सोडितील सदनाला,
गणगोत जसे आपणांला ।। १ ।।

बहु दिवसांच्या जुन्या कुडाच्या भिंती,
कुजुनी त्या भोकें पडती.
त्यांमधुनी त्या दाखविती जगताला
दारिद्य्र आपुले बाळा.
हें कळकीचें जीर्ण मोडके दार
कर कर कर वाजे फार;
हें दुःखाने कण्हुनि कथी लोकांला
दारिद्य्र आपुले बाळा.
वाहतो फटींतूनि वारा;
सुकवीतो अश्रूधारा;
तुज नीज म्हणे सुकुमारा !
हा सूर धरी माझ्या या गीताला
निज नीज माझ्या बाळा ! ॥ २ ॥

जोंवरतीं हें जीर्ण झोपडें अपुलें
दैवानें नाही पडलें,
तोंवरतीं तूं झोप घेत जा बाळा;
काळजी पुढे देवाला !
जोंवरतीं या कुडीत राहिल प्राण,
तोंवरि तुज संगोपीन;
तदनंतरची करूं नको तूं चिंता;
नारायण तुजला त्राता.
दारिद्रया चोरिल कोण?
आकाशा पाडिल कोण?
दिग्वसना फाडिल कोण?
त्रैलोक्यपती आतां त्राता तुजला !
निज नीज माझ्या बाळा ! ॥ ३ ॥

तुज जन्म दिला, सार्थक नाही केलें,
तुज कांहिं न मी ठेविलें.
तुज कोणि नसे, छाया तुज आकाश;
धन दारिद्र्याची रास;
या दाही दिशा वस्त्र तुला सुकुमारा;
गृह निर्जन रानीं थारा;
तुज ज्ञान नसे अज्ञानाविण कांहिं;
भिक्षेविण धंदा नाहिं.
तरि सोडुं नको सत्याला,
धन अक्षय तेंच जीवाला,
भावें मज दिनदयाळा,
मग रक्षिल तो करुणासागर तुजला,
निज नीज माझ्या बाळा ! ॥ ४ ॥


 दत्त (दत्तात्रय कोंडो घाटे) - सन १८९७


(श्री. प्रकाश बाक्रे यांच्या सौजन्याने)

गाणे (ध्वनिमुद्रण) ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
.निज नीज माझ्या बाळा

20 comments:

Dhananjay S Kulkarni said...
This comment has been removed by a blog administrator.
Suresh Shirodkar said...

Sharad sai:

In my childhood my mother was to sung this poem. Also, our family was very poor. I started identifying our conditions with the poet’s description. So pathetic description of poverty. He was merely 22 years old when he penned this poem.

- Sharad Sapkal, Nagpur

Suresh Ingole said...

मला आवडणारे अप्रतिम अंगाई गीत. माझी आई साठ वर्षापुर्वी माझ्या धाकट्या भावंडांना झोपवून देताना गात असे. मला तोंडपाठ झालेल्या अनेक कवितांपैकी हे एक गीत.

Unknown said...

ही कविता खुप लहानपणी ऐकलेली आहे. बहूतेक आमच्या पाठ्यपुस्तकात होती.पण ईतकी उदास कविता एवढ्या कोवळ्या, निरागस मनावर किती नकारात्मक परिणाम करित असेल याचा विचार केला नसेल काय सिलॅबस ठरविणार्या समितिने?

Unknown said...

मी टाकलेल्या कमेंटचे काय झाले ते मला कळेल काय?

Subhash Kulkarni said...

जग रहाटी नि माणसांच्या पराकोटीच्या आसक्ती पोटी आलेल्या अनुभवातून त्या माऊलीला उमजलेले जग नि त्यातूनच आपल्या माघारी आपल्या लेकराची उपेक्षा होवू नये म्हणून अंगाई गीता मधुन एका हतबल झालेल्या पण संस्कारीत असलेल्या आई चे एक जगावेगळे निरुपम आहे ;
मन हळवे करतांना ही विलक्षण अंतर्मुख करायला लावणारी एक सुंदर कविता --!
सुभाष तोंडोळकर /पुणे/ ३/५/२०२०

Unknown said...

मी ५वित शिकत असताना ही कविता माझ्या वर्ग शिक्षक यांनी ज्या चालीत व ठेक्यात शिकविले ती चाल व ठेका.मी विसरू शकत नाही.रवी म्हणजे वडील नसतानचे अंगाई गीत, बाळाला मोठे करणे एकच ध्येय,आईचे प्रेम,संस्कार घडविणारी. संस्कारित आईची ही अंगाई गीत,बाळाचे मन हलके करून बाळाला झोपी घालणारी ही कविता कवी दत्त यांची ही सुंदर कविता.

Unknown said...

मी लहान असताना माझी आजी घर च्या लहान मुलांना झोपवितांना फार चांगल्या गोड चालीत म्हणत असे त्यावेळी मला पाठ झाली होती पण कालांतराने विसर्जन पडला होता आता शब्द माहीती झाल्याने फार चांगले वाटले.

Unknown said...

आईच्या प्रेमाच मूर्तिमंत काव्य,आईला आपल्या मुलाची किती काळजी असते हे या कवितेत वाचतांना डोळ्यात पाणी आल, असे काव्य परत होणे नाही

Me & My Kitchen said...

माझ्या बाबांचे मराठीचे पुस्तक लहान असतांना मला मिळाले होते त्यामध्ये ही कविता होती , तेव्हापासुनच मला ही कविता खूप आवडायची . माझ्या मुलाला झोपवताना ही अंगाई मी नेहमी म्हणत असे आणि आता त्याच्या मुलीला पण म्हणते ती पण आता सात वर्षांची आहे . अगदी अर्थपूर्ण आणि प्रत्येक वेळी डोळे पाणावतात . कधीही विस्मरणात न जाणारी कविता 🙏

BK Inamdar said...

गरिबीचे भयावह वर्णन।

Unknown said...

My evertime khupch khupch Manbhavan geet in childhood now always humming

Unknown said...

मी मी नऊ वर्षांचा असताना माझे बाबा माझ्या लहान भावाला झोपविताना ही कविता म्हणायचे एकदम सुरात म्हणायचे की बाळ झोपी जायचे आता माझे वय 48 वर्षे आहे आणि माझ्या बाबांचे 82
आणि अजूनही ही माझ्या मुलीच्या मुलाला झोपवण्यासाठी ही कविता म्हणतात ऐकायला खूप सुंदर वाटते
मी ऐकून ही कविता माझ्या एका वहीवर लिहून ठेवली होती पण आता प्रत्यक्षात मला मोबाईल वर मिळाली खूप आनंद झाला

Unknown said...

मी लहान असताना माझे वडील व आई मला झोपवतांना हेच गीत गात असे
.मी पाचवीत असताना मला ही कविता होती.मी सुध्दा मा्झ्या मुलांना झोपवतांना हेच गीत गात असे.व आजही माझ्या नातवंडांना थोपविण्यासाठी ‌हेच गीत गात आहे.फारच छान गीत आहे.‌मला खूपच आवडते.

Unknown said...

माझी आई आम्ही लहान असताना रोज रात्री आम्हाला झोपवण्यासाठी ही कविता अगदी सुरेख आवाजात म्हणायची तेव्हापासूनच मला सुद्धा ही कविता खुप आवडते, आईला ही कविता मी लिहून सुद्धा मागितली होती, एक दोन ओळी तिला बरोबर आठवत नव्हत्या, आता मीही माझ्या मुलांना अंगाई गीत जाताना ही कविता म्हणायची आता मुलं थोडी मोठी झाली तरीसुद्धा त्यांना म्हणून दाखविते कारण त्यांनाही त्यावेळच्या कविता कशा होत्या आणि कशा पद्धतीने शिकविल्या जायच्या ते मुद्दाम कळावे म्हणून म्हणत असते खूप सुंदर आणि हृदयस्पर्शी कविता आहे ही मला खुपच आवडते ,

Unknown said...

माझी आई आम्ही लहान असताना रोज रात्री आम्हाला झोपवण्यासाठी ही कविता अगदी सुरेख आवाजात म्हणायची तेव्हापासूनच मला सुद्धा ही कविता खुप आवडते, आईला ही कविता मी लिहून सुद्धा मागितली होती, एक दोन ओळी तिला बरोबर आठवत नव्हत्या, आता मीही माझ्या मुलांना अंगाई गीत जाताना ही कविता म्हणायची आता मुलं थोडी मोठी झाली तरीसुद्धा त्यांना म्हणून दाखविते कारण त्यांनाही त्यावेळच्या कविता कशा होत्या आणि कशा पद्धतीने शिकविल्या जायच्या ते मुद्दाम कळावे म्हणून म्हणत असते खूप सुंदर आणि हृदयस्पर्शी कविता आहे ही मला खुपच आवडते ,

Atul Kulkarni said...

हे अंगाई गीत माझे दादा वडील माझ्यासाठी गायचे, आज मी ते माझ्या मुलांसाठी गातो याचा मला खूप अभिमान आणि खूप आनंद आहे 🙏

Unknown said...

मला माझ्या लहानपणी ही कविता होती शाळेत असताना चाल लावून म्हणत असे. आता छोट्या नातवाला म्हणतो.🙂

Unknown said...

हे अंगाई गीत माझी आई मला लहानपणी गाऊन झोपवित असेल.
आणि गंमत अशी की हेच अंगाई गीत माझ्या आईला माझी आजी गाऊन झोपवित असेल आणि त्या पुढची गंमत अशी की माझ्या आजीला तिचे मोठे बंधू म्हणजे दत्तात्रय कुलकर्णी ही कविता गाऊन झोपत असत.
आणि आज मी माझ्या मुलांना ही अंगाई कधीतरी आवर्जून गाऊन झोपण्याचा प्रयत्न करत असतो अशीही चार पेढ्या ने गायलेलं हे गीत आजही गाताना डोळ्याच्या कडा ओले केल्याशिवाय राहत नाही खरंतर गाणाऱ्या प्रत्येक जीवाच्या डोळ्यातून अश्रू बाहेर काढण्याच सामर्थ्य या कवितेला प्राप्त झालेल आहे .त्यांच्या या रचनेला अंतकरणातून सलाम.


स्मिता पाटील, पालघर said...

माझी आई आम्हा भावंडाना हि कविता अंगाई गीत म्हणून गाऊन झोपवत असे, पुढे ती तिच्या नातवंडांना हेच अंगाई गीत म्हणत असे त्यामुळे मला ते तिने गायलेल्या कर्णमधुर चालीत पाठ झाले होते आता माझ्या नातवाला झोपवण्याकरिता मी आठवत होते आणि मला सलग आठवत नव्हते,तीही आता हयात नाही म्हणून मी गूगल केले आणि आपला हा सुंदर ब्लॉग मिळाला!
माझी आई आणि गाण्याचे लेखक आणि आपणासारख्या संग्रहकाचे मनापासून आभार, धन्यवाद🙏